शिंदे सरकारवर मुस्लिम समाजाचा विश्वास नाही का...? का अडवणार मंत्र्यांच्या गाड्या
शिंदे सरकारवर मुस्लिम समाजाचा विश्वास नाही का...? का अडवणार मंत्र्यांच्या गाड्या
औरंगाबाद, दि.4(डि-24 न्यूज) राज्यातील एकनाथ शिंदे सरकार हे मुस्लिम अल्पसंख्याक समाजाच्या प्रश्नांकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत आहे का...? अशी शंका आता मुस्लिम समाजाच्या मनात निर्माण होत आहे. गंभीर प्रश्न उच्च शिक्षण घेणाऱ्या मुस्लिम अल्पसंख्याक विद्यार्थ्यांना फेलोशिप मिळावी या मागणीसाठी मार्टी कृती समितीच्या वतीने लोकशाही मार्गाने धरणे, आंदोलन, उपोषण करण्यात आले. शहरात काही महिन्यांपूर्वी झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीसाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आले असताना कृती समितीचे अध्यक्ष एड अजहर पठाण यांनी सुभेदारी विश्रामगृह रस्त्यावर ताफा अडवून मागणीचे निवेदन दिले. राज्याचे अल्पसंख्याक विकासमंत्री अब्दुल सत्तार यांच्या सोबत मार्टीची स्थापना करण्यात यावी हि मागणी केली. राज्य सरकार या विषयावर गंभीर आहे. लवकरच शासन निर्णय घेणार असे ठोस आश्वासन दिले तरीही निर्णय घेतला नसल्याने समाजात तीव्र नाराजी आहे. 19 ऑक्टोबर रोजी शासन आदेश काढले त्यामध्ये बार्टी, सारथी, टार्टी, महाज्योती, अमृत योजनेला निधी उपलब्ध करून उच्च शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्ती व विविध सोय सुविधा उपलब्ध करून दिली जात आहे त्याच धर्तीवर मुस्लिम अल्पसंख्याक समाजाच्या विद्यार्थ्यांना विविध योजनेत एक समानता आणण्यासाठी मौलाना आझाद संशोधन व प्रशिक्षण संस्था(मार्टी) स्थापन करुन येणाऱ्या हिवाळी अधिवेशनात निर्णय घेण्यात यावा नसता राज्यात मंत्र्यांच्या गाड्या अडवून जाब विचारला जाईल असा इशारा आज पत्रकार परिषदेत मार्टी कृती समितीचे अध्यक्ष एड अजहर पठाण यांनी दिला आहे. यावेळी कृती समितीच्या पदाधिकाऱ्यांनी आपली मते मांडली. लोकशाही मार्गाने आंदोलन करुन मागणी मान्य करण्यासाठी प्रयत्न केले जातील. मागणी मान्य झाली नाही तर तीव्र आंदोलन करण्याचा इशारा यावेळी देण्यात आला आहे.
यावेळी मौलाना आझाद संशोधन एण्ड ट्रेनिंग इन्स्टिट्यूट(मार्टी) चे अध्यक्ष एड अजहर पठाण, सर आसिफ, साजिद पटेल, शेख मुख्तार, शेख हज्जू पटेल, सरताज खान, एजाज खान, डॉ. शेख अफसर, शेख मतीन, प्राचार्य शेख सलीम, जलिस अहेमद, हाफिज असरार उपस्थित होते.
What's Your Reaction?