महीला आणि लहान मुलांवर हल्ले करणारे शिवप्रेमी असू शकत नाही, सत्यशोधन समितीचे मत

 0
महीला आणि लहान मुलांवर हल्ले करणारे शिवप्रेमी असू शकत नाही, सत्यशोधन समितीचे मत

महीला आणि लहान मुलांवर हल्ले करणारे शिवप्रेमी असु शकत नाहीत!

सत्य शोधन समितीचे मत..

छ.संभाजीनगर(औरंगाबाद) दि.6(डि-24 न्यूज)

विशाळगडावरील घटनेचे तथ्य शोधन करण्यासाठी २१ आणि २२ जुलै २०२४ रोजी असोसिएशन फॉर प्रोटेक्शन ऑफ सिव्हील राईट्स आणि सेंटर फॉर स्टडी ऑफ सोसायटी अँड सेक्युलॅरिझम

या संस्थांनी मिळून हि भेट आयोजित केली होती, त्यात मुंबईतील इरफान इंजिनिअर, संचालक, सेंटर फॉर स्टडी ऑफ सोसायटी अँड सेक्युलॅरिझम; अस्लम गाझी, एकझिक्युटिव्ह प्रेसिडेंट ए. पी. सी. आर; मेराज सिद्दीकी, मुस्लिम नुमाईंदा कौन्सिल, औरंगाबाद;

ॲड. अभय टाकसाळ, कम्युनिस्ट पार्टी ऑफ इंडिया; ; मिथिला राऊत, वोलंटीअर, सेंटर फॉर स्टडी ऑफ सोसायटी अँड सेक्युलॅरिझम; मजहर फारुकी, मेंबर ए. पी.सी.आर.; अब्दुल मुजीब, सेक्रेटरी जमात ए इस्लामी (जालना);

इस्माईल शेख, जे. आय. एच.(कोल्हूर), अश्फाक पठाण, पी.आर.ओ; एस.आय, कोल्हापूर

यांचा सहभाग होता.

महीला आणि लहान मुलांवर हल्ले करणारे शिवप्रेमी असु शकत नाहीत. छत्रपति शिवाजी महाराजांनी मुस्लिम महीलांचा सन्मान केला, त्यांना मातेसमान मानले. रायगडावर मशिद बांधली. मुस्लिमांचा द्वेष केला नाही. रयतेची आई प्रमाणे काळजी घेतली, भेदभाव केला नाही. 

आम्ही सत्यशोधन समितीचे सदस्य गजापुर मध्ये हल्ल्याचे बळी पडलेल्या लोकांशी बोललो, खास करून शिराज कासम प्रभुलकर, रजा जामा मशीद या ३०० वर्षे जुन्या मशीदच्या ट्रस्टचे अध्यक्ष आणि इतर ग्रामस्थ, कोल्हापूर शहरात काही लोकांची भेट घेतली.

या भेटीत खालील बाबी आढळून आल्या.

 हा हल्ला पूर्व नियोजित हल्ला होता. गजापुर गावातील मुस्लिम लोक तेथील स्थानिक आहेत, त्यांनी जमीनी अनधिकृत रीत्या बळकावलेल्या नाहीत, त्यांच्या कडे जमिनीचे घराचे कागद पत्र आहेत, मशीदीचेही कागद पत्र आहेत. मोठ्या प्रमाणावर या गावातील मुस्लिम पुरुष मुंबई व इतर ठिकाणी नोकरी कामधंदा करतात. सणासुदीला कुटुंबातील व्यक्तींना भेटण्यास येतात. त्यांचा आणि विशाळ गडावरील अनधिकृत स्टॉलशी काहीच संबंध नाही. विशालगड येथील दर्गा, गजापुर मधील मशिद व मुस्लिम वाडी ही अतिक्रमण नाही..छत्रपति शिवाजी महाराजांच्या काळाच्या अगोदर पासुन सदर दर्गा आहे. दर्गाच्या समोरील स्टाॅल हे अतिक्रमण आहेत..व हे स्टाॅल हिंदु मुस्लिमांनी लावलेली होती. अतिक्रमण काढण्याचे काम हे प्रशासनाचे आहे...खाजगी व्यक्तीचे नव्हे..

हल्ले खोरांच्या हातात, तलवार, हातोडे, सब्बल होते.

 हल्ला करण्याचे कारण राजकीय आणि सांप्रदायिक दिसतं कारण विधानसभा निवडणुका तोंडावर आल्या असताना हा हल्ला झाला आणि मुस्लिम समुदायातील लोकांवर हल्ला झाला ज्यांचा अतिक्रमनाशी काहीच संबंध नाही. गाजापुर हे गाव विशाळ गडपासून ५ किमी दूर आहे. त्यांच्यावर हल्ला मुस्लिम असल्या मुळेच केला.

अतिक्रमण करणारे सगळे बाहेरचे लोक होते, स्थानिक व्यक्ती नारायण पांडुरंग वेल्हार यांच्या घरी अगोदर, रवींद्र पडवळ यांच्या पुढाकाराने काही मीटिंग झाल्या होत्या, ज्यांचे नाव एफ आय आर मध्ये देखील आहे.

एफ.आय.आर मध्ये नारायण पांडुरंग व्हेल्हार यांचे नाव दिले असता पोलिसांनी ते घेतले नाही.

पोलिसांनी जो बंदोबस्त करायला पाहिजे होता तेवढी त्यांनी दक्षता घेतली नाही. पोलिसांनी त्या वेळेसच नाकाबंदी केली पाहिजे होती, पोलिसांनी दक्षता पूर्वक कर्तव्य बजावले नाही. त्या निष्काळजी पणा मुळे गजापुर गावातील घरे आणि दुकाने मिळून ४१ आणि ३०० वर्षे जुनी एक मजीद असे एकूण ४२ वास्तू तोडल्या. तसेच ५१ वाहने त्यात १७ चार चाकी आणि ३४ दुचाकी वाहनांचे नुकसान झाले. हा हल्ला काही लोकांच्या मते स. 11 तर काहींच्या मते दुपारी १२.३० ते सायंकाळी ५ एवढ्या दीर्घ कालावधीत चालू होता. एका घरातील रू. नव्वद हजार सहा तोळे सोने लुटले. दुसऱ्या दोन घरातील प्रत्येकी ३ टोळे सोने आणि काही पैसे लुटले. धन्य कडधान्ये फेकून टाकले, टी. व्ही, कपाटे, फ्रिज, लाईट कनेक्षण असे जे मिळेल त्याची नास धुस केली. कुराण ची कॉपी जाळली. मशीदची तोडफोड केली आणि कब्रस्थान चे कुंपण तोडले. ज्या घरातील लोकांनी मिरवणूक जाताना पाणी मागितल्यावर पाणी दिले, पाऊस होता म्हणून छत्री आणि रेनकोट दिले त्याच घरात दोन सिलिंडरचा स्पोट केला. मिरवणुकी मध्ये पंधरा हजार लोक होते पण अंदाजे पंधराशे लोकांनी हल्ला केला.

 मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि गृहमंत्री देवेंद्र फडणविस, यांनी हल्ल्याचा निषेध न करता, करता विशाळ गडा वरून अतिक्रमण हटवण्याचे आश्वासन दिले आणि १५ जुलैला वर्तमान पत्रात नमूद केल्या नुसार विशाळ गडावरील ३५ अनधिकृत दुकाने तोडली.

 हिंसक जमावाने पोलिसांवर देखील हल्ला केला त्यात ११ पोलीस कर्मचारी जखमी झाले. मुस्लिम समुदायातील लोक जंगलात पळून गेले होते म्हणून वाचले नाहीतर जीवघेणा हल्ला झाला असता. त्यातील एका व्यक्तीला, याकूब मोहम्मद प्रभुलकर अपंग असल्या मुळे पळता येत नव्हते त्याच्या पायाला दोन आणि हाताला एक फ्रॅक्चर झाले, जो आता प्राणी रुग्णालयात उपचार घेत आहे.

संजय पाटील, राजू कांबळे, मंगेश कांबळे, पांडुरंग कोंडे, मारुती निबले, चंद्रकांत कोकरे असे सर्वच समाजाचे लोक संध्याकाळी गजापुर गावातील मुस्लिम लोकांना धीर देण्यासाठी आले व त्यांच्यासाठी जेवण देखील घेऊन आले होते.

सर्व प्रथम व्यवस्थित गजापूर गावातील लोकांचे नुकसानीचे पंचनामे करून त्यांना नुकसान भरपाई सरकारने तातडीने दिली पाहिजे. सध्या सरकारने दिलेले रू. २५०००/- चेक अगदीच अपुरा आहे.

प्रत्येक नुकसानीचे वेगवेगळे एफ. आय. आर झाले पाहिजेत. 

 एस.आय. टी नेमून उच्च न्यायालयाच्या निगराणी खाली त्याची चौकशी व्हावी व दोषींना कडक शिक्षा व्हावी. त्यांच्यावर दहशत वादाचा गुन्हा दाखल व्हावा. 

 ह्या हल्ल्याचा कट कोणी, कधी आणि कुठे केला, याचा मुळ सूत्रधार कोण आहे हे शोधून काढावे. या हल्ल्याच्या वेळी निष्क्रीय राहीलेले कोल्हापूरचे एसपी आणि जिल्हाधिकारी यांना निलंबित करावे . 

 महाराष्ट्रातील काही हिंदुत्ववादी लोक व इतर भाजपचे आमदार यांच्या कडून बरीच द्वेष जनक भाषणे दिली गेली आहेत. द्वेष जनक पसरवणा-यांवर देखील शासनाने कठोर कार्यवाही केली पाहिजे. महीला आणि लहान मुलांवर हल्ले करणारे शिवप्रेमी असु शकत नाहीत. 

गांंधी भवन, येथे झालेल्या या पत्रकार परिषदेस स्वराज अभियानचे सुभाष लोमटे, भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे ॲड अभय टाकसाळ , मुस्लिम नुमाईंदा कौन्सिलचे मेराज सिद्दिकी उपस्थित होते.

English news...

Those who attack women and children cannot be Shiva lovers!

 Opinion of Satya Shodan Committee..

 Chhatrapati Sambhajinagar,Aug 6 Members of Association for Protection of Civil Rights and Center for Study of Society and Secularism on Tuesday opined that, those who attack women and children at Vishalgad cannot be Shiv Chhatrapati lovers.

On July 21 and 22 2024 to find out the facts of Vishalgad incident.

The meeting was jointly organized by these institutions, including Irfan Engineer, Director, Center for Study of Society and Secularism, Mumbai, Aslam Ghazi, Executive President APCR, Meraj Siddiqui, Muslim Representative Council, Chhatrapati Sambhajinagar.

Addressing a press conference here on today Adv. Abhay Taksal, Communist Party of India, Sathi Subhash Lomte and Meraj Siddiqui stated that,those who attack women and children cannot be Shiva lovers. Chhatrapati Shivaji Maharaj respected Muslim women, treating them as mothers.  

A mosque was built at Raigad fort. He did not hate Muslims.Citizens was taken care of like a mother and did not discriminate. 

They said that , members of the Satyasodhan Samiti spoke to the victims of the attack in Gajapur, especially Shiraj Kasam Prabhulkar, Chairman of the Trust of the 300-year-old Raza Jama Masjid and other villagers, met some people in Kolhapur city.

In which they found that attack was a pre-planned attack. The Muslim people of Gajapur village are local there, they have not grabbed the land in an unauthorized manner, they have the house papers of the land, also the mosque papers.

 The dargah at Vishalgad, the mosque and the Muslim wadi in Gajapur are not encroachments. The task of removing encroachment is that of the administration not of the private individual.

The motive for the attack appears to be political and communal as the attack took place as assembly elections loomed and targeted people from the Muslim community who had nothing to do with the encroachment and among others findings .

  They demanded that ,first of all the people of Gajapur village should be properly assessed and compensated by the government immediately. At present the government has given Rs. 25000/- check is very insufficient

  SIT should be investigated under the supervision of the High Court and the culprits should be severely punished. A case of terrorism should be registered against them.

  We should find out who is the main mastermind of this attack, when and where. Kolhapur SP and Collector who remained inactive during this attack should be suspended.

  A lot of hate speeches have been given by some Hindutva people and other BJP MLAs in Maharashtra. The government should also take strict action against those who spread hatred. Those who attack women and children cannot be Shiva lovers,they added.

.

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow