पासपोर्ट सेवा केंद्रात 7 ते 10 दिवसांत मिळणार पासपोर्ट
खासदार इम्तियाज जलील यांनी यशस्वीरीत्या केलेल्या पाठपुराव्यास यश !
औरंगाबाद पासपोर्ट सेवा केंद्रात फक्त 7 ते 10 दिवसात मिळणार पासपोर्ट
औरंगाबाद,दि.11(डि-24 न्यूज) औरंगाबाद मध्ये पासपोर्ट सेवा केंद्र (POPSK) आतापर्यंत कॅम्प मोडमध्ये कार्यरत होते. त्या ठिकाणी पासपोर्टसाठी अर्जदारांच्या कागदपत्रांची तपासणी करून त्याची फक्त माहिती सॉफ्टवेअरमध्ये अपडेट करण्याचे काम केले जात होते. आणि त्यानंतर स्पीड पोस्टद्वारे प्रादेशिक पासपोर्ट कार्यालय मुंबईला प्रत्यक्षरित्या कागदपत्रे पाठविले जायची. मुबई विभागीय पासपोर्ट कार्यालयात कागदपत्रे स्कॅन करून सक्षम संबंधित अधिकारी योग्य ती कार्यवाही करून अर्जदारांच्या पासपोर्टला मान्यता देत होते, पासपोर्ट मिळविण्याच्या यासर्व प्रक्रियेला साधारणतः 20-30 दिवसाचा कालावधी लागत असे. शहरातील पासपोर्ट सेवा केंद्र हे मराठवाडा विभागातील सर्वात गर्दीचे केंद्र असून सुद्धा याठिकाणी दररोज फक्त 60 अर्जांवरच कार्यवाही केली जात होती.
खासदार इम्तियाज जलील यांनी नागरिकांना येणारे अडचणी व समस्यांचे निराकरण करणेस्तव तसेच नागरिकांना सुलभरीत्या व जलदगतीने पासपोर्ट सेवा मिळावी याकरिता पासपोर्ट कार्यालयातील वरिष्ठ अधिकाऱ्यांना पत्र लिहून शहरात पासपोर्ट सेवा केंद्र (POPSK) लवकरात लवकर अद्यावत करून केंद्र सुरू करण्याची मागणी केली होती.
तसेच खासदार इम्तियाज जलील यानी मुंबई विभागीय पासपोर्ट अधिकारी डॉ.राजेश गावंडे याची भेट घेवून सविस्तर चर्चा केली आणि शहरात पासपोर्ट सेवा केंद्र लवकरात लवकर सुरू करण्याची मागणी केली होती. डॉ.राजेश गावंडे यानी खासदार जलील यांच्या मागणीला सकारात्मक प्रतिसाद देत अल्प कालावधीत पासपोर्ट सेवा केंद्राला (POPSK) स्कॅनर मोड मधे रूपांतरित केले.
खासदार जलील यांच्या मागणीची गंभीर दखल घेत शहरातील पासपोर्ट सेवा केंद्र अद्यावत करून सुरू करण्यात आले असून सुरुवातीला या केंद्रात दोन स्कॅनर असतील भविष्यात त्यात वाढ होणार आहे. याठिकाणी अर्जदारांची कागदपत्रे तपासून स्कॅन केली जातील. त्यानंतर मुंबई येथील विभागीय पासपोर्ट अधिकारी त्वरित कागदपत्रे तपासून पासपोर्टला मंजुरी देतील. त्यानंतर पासपोर्ट प्रिंट करून स्पीड पोस्टद्वारे अर्जदारांना पाठवला जाईल.
या सेवेमुळे पासपोर्ट मिळवण्यासाठी लागणारा वेळ 20-30 दिवसांवरून थेट 7-10 दिवसांपर्यंत कमी होईल. त्यामुळे नागरिकांना मोठा दिलासा मिळून अर्जदारांचा बराच पैसा आणि वेळ सुद्धा वाचणार आहे. मागील आर्थिक वर्ष 2022-23 मध्ये औरंगाबाद पासपोर्ट सेवा केंद्राद्वारे सुमारे 15000 अर्जदारांच्या अर्जावर कार्यवाही करण्यात आली होती आणि या चालू आर्थिक वर्षात आतापर्यंत सुमारे 9000 अर्जावर कार्यवाही करण्यात आलेली आहे.
What's Your Reaction?