महापालिकेची करवसुली मोहीम, एकाच दिवसात 17 मालमत्ता सिल, 92.70 लक्ष कर वसुली...!
महानगरपालिकेतर्फे कर वसुली मोहीम
एकाच दिवसात 17 मालमत्ता सील तर रु. 92.70 लक्ष एवढा कर वसूल
छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद), दि.20(डि-24 न्यूज)- महापालिका आयुक्त श्री अमोल येडगे यांच्या आदेशानुसार आज दिनांक 20 जून रोजी महापालिकेच्या सर्व 10 झोन अंतर्गत कर वसुली मोहीम राबवण्यात आली. यात आयुक्तांच्या सूचनेनुसार अतिरिक्त आयुक्त श्रीमती कल्पिता पिंपळे व उप आयुक्त श्री विकास नवाळे यांनी सर्व 10 झोन मधे प्रत्येकी 15 ते 20 मोठ्या थकबाकीदारांची यादी कार्यवाहीसाठी नेमून देण्यात आली होती. त्यावर आज झोन निहाय कर वसुली पथकांनी कार्यवाही केली.
दिवसभरात झोन निहाय पुढीलप्रमाणे कार्यवाही झाली.
झोन 1,
17 थकबाकीदारांपैकी 10 मालमत्ताना भेट दिली. त्यापैकी 1 मालमत्ता सील करण्यात आली तर 3 थकबाकीदारांकडून एकूण रु.13.60 लक्ष एवढा मालमत्ता कर वसूल करण्यात आला.
झोन 2
11 थकबाकीदारांपैकी मालमत्ताना भेट दिली. त्यापैकी 1 मालमत्ता सील करण्यात आली तर थकबाकीदारांकडून एकूण रु.1.00 लक्ष एवढा मालमत्ता कर वसूल करण्यात आला.
झोन 3
7 थकबाकीदारांपैकी 5 मालमत्ताना भेट दिली. त्यापैकी 2 मालमत्ता रक्कम रु. 25.54 लक्ष थकबाकी असल्याने सील करण्यात आल्या.
झोन 4
11 थकबाकीदारांपैकी 10 मालमत्ताना भेट दिली. त्यापैकी 3 मालमत्ता सील करण्यात आल्या तर 3 थकबाकीदारांकडून एकूण रु.4.60 लक्ष एवढा मालमत्ता कर वसूल करण्यात आला.
झोन 5
10 थकबाकीदारांपैकी 6 मालमत्ता सील करण्यात आल्या तर 5 थकबाकीदारांकडून एकूण रु.19.09 लक्ष एवढा मालमत्ता कर वसूल करण्यात आला.
झोन 6
3 मालमत्ता सील करण्यात आल्या तर 4 थकबाकीदारांकडून एकूण रु.13.65 लक्ष एवढा मालमत्ता कर वसूल करण्यात आला.
झोन 7
13 थकबाकीदारांपैकी 3 मालमत्ता सील करण्यात आल्या तर एकूण रु.3.75 लक्ष एवढा मालमत्ता कर वसूल करण्यात आला.
झोन 8
14 थकबाकीदार पैकी 1 मालमत्ता सील करण्यात आली तर 8 थकबाकीदारांकडून एकूण रु.36.75 लक्ष एवढा मालमत्ता कर वसूल करण्यात आला.
झोन 10
थकबाकीदारांपैकी 3 मालमत्ता सील करण्यात आल्या तर 2 थकबाकीदारांकडून एकूण रु.3.00 लक्ष एवढा मालमत्ता कर वसूल करण्यात आला.
अशाप्रकारे महानगरपालिकेने आज राबवलेल्या विशेष कर वसुली मोहिमेत एकूण 73 मालमत्तांना भेटी दिल्या. त्यापैकी 17 थकबाकीदार मालमत्ता सील करण्यात आल्या तर एकूण रु.92.70 लक्ष एवढा मालमता कर वसूल करण्यात आला.
What's Your Reaction?