अल-फरहान मेडिकल फाउंडेशनच्या रक्तदान शिबिरात 601 रक्तदात्यांनी केले रक्तदान...!
अल-फरहान मेडिकल फाउंडेशनच्या रक्तदान शिबिरात 601 रक्तदात्यांनी केले रक्तदान...!
छत्रपती संभाजीनगर(औरंगाबाद), दि.22(डि-24 न्यूज) मागिल अनेक वर्षांपासून गरजू रुग्णांना आरोग्य सेवेत मदत करत असलेल्या अल-फरहान मेडिकल फाउंडेशनच्या वतीने दरवर्षी प्रमाणे यंदाही भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन शहरातील तीन ठिकाणी करण्यात आले होते. हे रक्तदान शिबीर युनुस काॅलनी, सिल्कमिल काॅलनी, आमखास मैदानावर एज्युकेशन एक्सपोत रात्री उशिरापर्यंत सुरू होते. फाऊंडेशनचे सदस्य काझी यांनी डि-24 न्यूजला माहिती देताना सांगितले रात्री दहा वाजेपर्यंत 601 रक्तदात्यांनी रक्तदान केले. हा आकडा वाढण्याची शक्यता आहे. यावेळी आयोजकांनी युवकांना आपल्या जीवनात रक्तदान करण्याची सवयी लावून घ्यावी. रक्तदान हे श्रेष्ठदान आहे. गरजू रुग्णांना या रक्तदाबामुळे जीवनदान मिळते.
What's Your Reaction?