20 जूलैपर्यंत जरांगेंनी दिला अल्टिमेटम, त्यानंतर 288 जागेवर उमेदवार उभे करायचा निर्णय घेणार...! शांतता संवाद रैलीत शिस्तीचे दर्शन
20 जूलै पर्यंत जरांगेंनी दिला अल्टिमेटम, त्यानंतर 288 जागेवर उभे करायचा निर्णय घेणार...सांगता रैलीत सरकारवर टीका
मंत्री छगन भुजबळ व मंत्री गिरीष महाजन यांच्यावर केली टिका, मराठ्यांची शक्ती वाया जाऊ देणार नाही, ओबीसीतूनच घेणार आरक्षण, तीन तास चालली रैली, मुस्लिम बांधवांनी रैलीत सहभाग घेत पाणी व भोजनाचे केले वाटप, ट्रॅक्टरचे रैलीत आकर्षण
छ.संभाजीनगर(औरंगाबाद) दि.13(डि-24 न्यूज) मनोज जरांगे पाटील यांची आज पहील्या टप्प्यातील शांतता संवाद रैलीचा समारोप छत्रपती शिवाजी महाराज यांच्या अश्वारुढ स्मारकासमोर क्रांती चौकात झाला. सायंकाळी सहा वाजता रैली येथे दाखल झाली. आपल्या भाषणात मनोज जरांगे पाटील यांनी सरकारला 20 जूलैपर्यंत मराठा समाजाच्या मागण्यांवर निर्णय घेण्याचा इशारा दिला. त्यानंतर आमरण उपोषणाला बसणार असाही इशारा दिला आहे. यावेळी 288 आमदार पाडायचे किंवा विधानसभेत उमेदवार उभे करायचे हा निर्णय घेणार आहे. यावेळी मंत्री छगन भुजबळ व मंत्री गिरीष महाजन यांच्यावर त्यांनी टिका केली. मराठ्यांची शक्ती वाया घालायची नाही. मला वाईट पाऊल उचलायचे नाही. मी आडमुठ्या नाही. समाजाला डाग लागू द्यायचे नाही. मला सर्व समाजाचा विचार करावा लागला पाहिजे. आतापर्यंत 57 लाख नोंदी मिळालेले आहे. त्यातून दिड कोटी मराठा समाजाला आरक्षण मिळवून दिले. त्यामुळे मला डाव टाकण्याची संधी द्या, म्हणजे सरकारला धारेवर धरता येईल. सरकारने दोन तीन डाव टाकले. ते मी 20 जूलै रोजी मराठा समाजाला सांगणार आहे. या सरकारला मराठा समाजाच्या वेदना समजणार नाही. मग महायुती असो किंवा महाविकास आघाडीचा एकही आमदार निवडून येणार नाही. एवढा शब्द समाजाच्या उपस्थितीत देत आहे. ओबीसीतूनच आरक्षण घेतल्याशिवाय राहणार नाही. जर रात्रीतून सरकारने निर्णय घेतला नाही तर तुमचा एकही आमदार देखील निवडून येणार नाही असा इशारा मनोज जरांगे पाटील यांनी यावेळी दिला आहे. 20 जूलै पासून आमरण उपोषणाला सुरुवात करणार आहे. त्यावेळी ठरवू आमदार पाडायचे की उभे करायचे. महाराष्ट्रातील कोणत्या मैदानावर सभा घ्यायची मुंबईत कधी जायचे ते ठरवू असे त्यांनी आपल्या भाषणात सांगितले.
शहरात उसळले भगवे वादळ...एक मराठा लाख मराठा या घोषणेने दणाणले शहर...
शनिवार मनोज जरांगे पाटील यांच्या मराठा आरक्षण शांतता संवाद रैलीचा समारोप शहरात झाला. सिडको येथील वसंतराव नाईक चौकापासून रैलीला सुरुवात झाली. सायंकाळी 5 वाजता या चौकात जरांगे पाटील यांचे आगमन झाले. प्रतिक्षेत असलेल्या समाजबांधवांचा यावेळी उत्साह वाढला. क्रांतीचौकात रैली पोहोचण्यासाठी 3 तास लागले. घोषणाबाजी करत रैली पुढे जात होती. परिसरात चहा, पाणी, नास्ता वाटप करण्यात येत होता. दोन वेळा पावसाचे आगमन झाले. माजी मुख्यमंत्री वसंतराव नाईक, छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यावर गुलाबपुष्पांचा वर्षाव करत जरांगेंनी अभिवादन केले. आकाशवाणी चौक, मोंढा नाका मार्गे रैली क्रांतीचौकात दाखल झाली. यावेळी मनोज जरांगे यांनी व्यासपीठावरुन संवाद सा
धला.
What's Your Reaction?