इंडिया आघाडीला मुस्लिम समाजाने भरभरून मते दिले तरीही एकमेव मुस्लिम उमेदवार इम्तियाज जलील यांना पाडले- ओवीसी
आरक्षणाची मर्यादा वाढवा, मराठा आरक्षण द्या आम्ही पाठींबा देतो, इंडिया आघाडीला मत दिले तरी इम्तियाज जलील यांना पाडले- ओवीसी
ज्या मतदार संघात पक्षाची ताकत जास्त आहे त्याबद्दल पदाधिकारी सोबत चर्चा करून घेतला आढावा, इम्तियाज जलील यांच्या पराभवामुळे ते विरोधकांवर भडकले, इम्तियाज जलील यांना महाराष्ट्रातील मोठी जवाबदारी देणार असल्याचे ओवेसी म्हणाले....
छ.संभाजीनगर(औरंगाबाद) दि.13(डि-24 न्यूज) मनोज जरांगे पाटील हे आपल्या मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी लढा देत आहेत. त्यांचा मी आदर करतो. त्यांच्या आंदोलनामुळे लोकसभा निवडणुकीत मराठा समाजाचे खासदार निवडून आले. जरांगे फॅक्टरमुळे पंकजा मुंडे सारख्या नेत्यांचा पराभव झाला. लोकसभेत अप्पर कास्ट आणि ओबीसींचे प्रतिनिधित्व बरोबर झाले पण मुस्लिम समाजाची देशात 14 टक्के लोकसंख्या असताना लोकसभेत फक्त चार टक्के लोक निवडून आले. हे लोकशाही मजबूत करण्यासाठी बरोबर नाही. सर्व जाती धर्मातील लोकांना प्रतिनिधित्व दिले जाते परंतु आपल्याला सेक्युलर समजणारे राजकीय पक्ष मुस्लिम समाजाची वोट बँक म्हणून उपयोग करता मग मुस्लिम समाजाला उमेदवारी देऊन निवडून का आणत नाहीत. महाराष्ट्रातून इंडिया आघाडीला मुस्लिम दलित समाजाने भरभरून मते दिली तरीही एक पण मुस्लिम उमेदवार दिला नाही उलट महाराष्ट्रातून एकमेव मुस्लिम उमेदवार इम्तियाज जलील होते त्यांना सर्वांनी मिळून पाडले याचे दु:ख होत आहे. यामुळे राज्यातील व देशातील मुस्लिम समाजात संतापाची लाट आहे. विधानपरिषदेत सुध्दा मुस्लिम उमेदवार दिला नाही यामुळे सुध्दा समाजात नाराजी आहे. मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी आमचा पाठिंबा आहे परंतु केंद्रातील सरकारने आरक्षणाची 50 टक्क्यांची मर्यादा वाढवा व मराठा-मुस्लिम समाजाला आरक्षण द्यावे आम्ही पाठींबा देतो. जरांगेंनी आगामी विधानसभा निवडणुकीत 288 जागेवर उमेदवार उभे करणार असल्याचे सांगितले त्यांनी दलित मुस्लिम समाजाला सोबत घेणार असल्याचे सांगितले तर एमआयएम सोबत जाणार का या प्रश्नावर त्यांनी सांगितले त्यावेळी राजकीय समीकरणे काय बणतात ते बघावे लागेल. वंचित सोबत काही चर्चा युती संदर्भात सुरू नाही हे सुद्धा एमआयएमचे सुप्रीमो खासदार असदोद्दीन ओवेसी यांनी पत्रकार परिषदेत स्पष्ट केले.
त्यांनी आज आगामी विधानसभा निवडणुकीची तयारी साठी उमेदवारांची चाचपणी व इच्छूकांशी संवाद साधला. पक्ष संघटना मजबूत करण्यासाठी पदाधिकारी सोबत चर्चा केली.
पत्रकार परिषदेत पुढे बोलताना ओवेसींनी सांगितले 4 जून नंतर एनडीएचे सरकार देशात तिस-यांदा सत्तेवर आल्यापासून अल्पसंख्याक समाजावर अन्याय अत्याचार वाढले आहे. विविध राज्यांत माॅब्लिंचिंग करुन दहा निष्पापांचा बळी घेतला. काही दोष नसताना बुलडोझरने गरीबांची घरे तोडली. एवढे अन्याय अत्याचार वाढत असताना काँग्रेस, राष्ट्रवादीचे नेते काही बोलायला तयार नाही. मते देण्यासाठी मुस्लिम समाज आणि त्यांच्यावर अन्याय झाला तर सेक्युलर पार्टीचे नेते त्यांच्या बाजूने उभे राहायला तयार नाही. इम्तियाज जलील यांना पाडणा-यांना हा प्रश्न विचारला पाहिजे.
एनडीए सरकारच्या विरोधात अविश्वास ठराव आला तर आपण इंडिया आघाडीच्या बाजूने संसदेत मतदान करणार का या प्रश्नावर ओवेसींनी उत्तर देताना सांगितले की मोदींच्या विरोधात आम्ही लढत आहोत युएपिए कायद्याला आम्हीच विरोध केला होता. काँग्रेस, राष्ट्रवादीने विरोध केला नाही. तो कायदा मुस्लिम दलितांच्या विरोधात वापरुन निष्पाप युवकांना तुरुंगात टाकले जात आहे. हे सरकार आल्यापासून मुस्लिम समाजाचेच जास्त नुकसान होत आहे म्हणून आम्ही या सरकारच्या विरोधात आहे यासाठी इंडिया आघाडीच्या बाजूने मतदान करु असे त्यांनी सांगितले. किती जागेवर उमेदवार द्यायचे अजून निर्णय घेतला नाही. सर्वांशी चर्चा करून नंतर किती जागेवर विधानसभा निवडणुकीत उमेदवार उभे करायचे कळवले जाईल अशी माहिती इम्तियाज जलील यांनी यावेळी दिली.
पत्रकार परिषदेत हैदराबाद मलकपेठचे आमदार अहमद बीन अब्दुल्लाह बनाला, प्रदेशाध्यक्ष इम्तियाज जलील, प्रदेश कार्याध्यक्ष डॉ गफ्फार कादरी, मराठवाडा अध्यक्ष फेरोज लाला उपस्थित होते.
What's Your Reaction?