माविम बचत गटांना उत्पादन विक्रीसाठी जागा उपलब्ध करून देणार
माविम बचत गटांना उत्पादन विक्रीसाठी जागा उपलब्ध करून देणार
औरंगाबाद, दि.17(डि-24 न्यूज) महिला आर्थिक विकास महामंडळाच्या बचत गटातील महिलांनी उत्पादीत केलेल्या उत्पादनांची विक्री करण्यासाठी जागा (स्टॉल) उपलब्ध करून देऊ, असे आज जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. विकास मीना यांनी सांगितले.
महिला आर्थिक विकास महामंडळ मार्फत बचत गटातील महिलांनी उत्पादित केलेल्या वस्तूचे भव्य प्रदर्शन व विक्री मेळाव्याचे आयोजन दि. 15 ते 17 दरम्यान करण्यात आले होते.
आज समारोपीय कार्यक्रमास डॉ.विकास मीना, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी पी. आर. देशमुख, नाबार्डचे सुरेश पटवेकर, किरण जाधव,सहा. आयुक्त अशोक कायंदे, किशन पवार आदी मान्यवर उपस्थित होते.
डॉ. मीना म्हणाले की, बचत गटातील महिलांनी आपले वस्तु, साहित्य गुणवत्ता पूर्ण तयार करावे. महीला शक्ती बळकट झाली तर देश सशक्त होईल. बचत गटातील महिलांनी उत्पादित केलेल्या मालाचे विक्री करण्यासाठी जिल्हा परीषद मध्ये जागा उपलब्ध करून देण्यात येईल असे आश्वासन दिले.
जिल्हा समन्वय अधिकारी चंदनसिंग राठोड माविम यांनी प्रास्ताविक केले तर सदर कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सर्व जिल्हा व सीएमआरसी टीम यांनी मदत केली.
सूत्र संचालन श्रीमती सुनिता शहाणे तर आभार प्रदर्शन श्रीमती अश्विनी डोके यांनी केले.
What's Your Reaction?