शिक्षकांच्या विविध प्रलंबित प्रश्नांसंदर्भात शिक्षक समितीचा आंदोलनाचा इशारा

 0
शिक्षकांच्या विविध प्रलंबित प्रश्नांसंदर्भात शिक्षक समितीचा आंदोलनाचा इशारा

शिक्षकांच्या विविध प्रलंबित प्रश्नासंदर्भात शिक्षक समितीचे आंदोलनाचा इशारा

छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद), दि.17(डि-24 न्यूज) राज्य शासन स्तरावर व जि.प स्तरावर शिक्षकांचे विविध विषय प्रलंबित आहेत त्या प्रश्नांची प्रशासनाने दखल घेऊन प्रश्न तात्काळ सोडवावीत अन्यथा शिक्षक समिती जि प कार्यालया समोर दि. 1 एप्रिल रोजी धरणे आंदोलन करेल अशा इशारा शिक्षक समितीने निवेदना द्वारे विभागीय आयुक्त , जिल्हाधिकारी , मुख्य कार्यकारी अधिकारी व शिक्षणाधिकारी यांना दिला आहे.

 या निवेदनात दि.15 मार्च 2024 संच मान्यतेचा शासन निर्णय रद्द करण्यात यावा ,

सन 2025 मध्ये होणाऱ्या बदल्यामध्ये सन 2018 मध्ये ज्या शाळा दुर्गम क्षेत्रात होत्या , परंतु त्या शाळा सन 2022 मध्ये सुगम क्षेत्रात आल्यामुळे तेथील शिक्षकांना दुर्गम क्षेत्रात काम करूनही त्यांच्या बदल्या अद्याप पर्यंत न झाल्यामुळे अशा शिक्षकांना होणाऱ्या बदल्यामध्ये बदली संवर्ग क्र.3 मध्ये समाविष्ट करून त्यांच्या वर होणारा अन्याय दुर करावा, राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020 ची अमलबजावणी पुढील शैक्षणीक वर्षापासुन होणार असल्यामुळे स्कॉपचे मुल्यमापन पुढील शैक्षणिक वर्षापासून राबविण्यात यावे,

वरिष्ठ वेतनश्रेणीस ( निवड श्रेणी ) पात्र शिक्षकांना तात्काळ वरिष्ठ वेतनश्रेणीचा ( निवड श्रेणीच ) लाभ देण्यात यावा, सन 2022 मध्ये दुर्गम क्षेत्रातील शाळांची निवड यादी उशीरा प्रकाशीत झाल्यामुळे सन 2022 च्या दुर्गम क्षेत्रात काम करत असलेल्या शिक्षकांना दुर्गम क्षेत्रात काम करण्याचा लाभ होत नसल्यामुळे सन 2022 मध्ये दुर्गम क्षेत्रात असलेल्या सर्व शिक्षकांना येणाऱ्या बदल्या मध्ये बदली संवर्ग क्र.3 मध्ये टाकून त्यावर होणारा अन्याय दुर करावा, न्यायालयीन बदली प्रकरणे बदली पूर्वी निकाली काढण्यात यावी, रमजान ईद सणा पुर्वी सर्व शिक्षकांचे मार्च 2025 चे वेतन अदा करण्यात यावे, जे पदवीधर शिक्षक स्वेच्छेने पदवीधर ग्रेड परत करण्यास तयार आहेत अशा शिक्षकांचे रिव्हर्शन करण्यात यावे. तसेच ज्या पदवीधर शिक्षकांनी बीएससी पूर्ण केले आहे त्यांना बदली करताना गणित/विज्ञान च्या जागी बदली करण्याची संधी मिळावी जेणेकरून गणित विज्ञानच्या जागा ही भरल्या जातील आणि सामाजिक शास्त्राचे शिक्षक पण अतिरिक्त होणार नाहीत, शालेय पोषण आहार चा black date entry data उपलब्ध करून देण्यात यावा.

या सर्व विषयांचा योग्य तो विचार करून न्याय दयावा , न्याय न दिल्यास नाईलाजस्त शिक्षक समितीच्या जि. प. कार्यालया समोर न्याय हक्क मागण्या साठी दि.1 एप्रिल 2025 रोजी धरणे आंदोलन करावे लागेल असा इशारा निवेदनाद्वारे देण्यात आला आहे.

     निवेदनावर जिल्हा अध्यक्ष विजय साळकर , जिल्हा सरचिटणीस रंजित राठोड , नितीन नवले , शामभाऊ राजपुत , विष्णु भंडारे , कडुबा साळवे , काकासाहेब मगर , दिलीप रासणे , अशोक डोळस , कैलास ढेपले , बबन चव्हाण , भाऊसाहेब बोर्डे , चंदु लोखंडे , जावेद अन्सारी , मुन्सी शहनाज, प्रविण गायकवाड ,दत्ता खाडे , रमेश पांचाळ , गजानन वरकड , पंजाबराव देशमुख , संतोष भाबड , संतोष जाधव , प्रकाश जाधव , भिमराव पंडीत , दत्तात्र्य थोरात , अर्चना पार्थीकर , शितल भडागे , जयश्री राठोड , संगीता मते , मंगला मदने , प्रिती जाधव , वर्षा राठोड अर्चना गोर्डे, दिपीका एरंडे , सुनिता चितळकर , विलास चव्हाण , विजय पवार , रामनाथ शेळके , रामेश्वर रोडे आदी सह शेकडो पदाधिकाऱ्याच्या स्वाक्षऱ्या आहेत.

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow