संजय केनेकर बणणार आमदार, भाजपाने दिली विधानपरिषदेची उमेदवारी...!
 
                                संजय केनेकर बनणार आमदार, भाजपाने दिली विधानपरिषदेची उमेदवारी...!
छत्रपती संभाजीनगर(औरंगाबाद),दि.16(डि-24 न्यूज) भाजपाचे प्रदेश सरचिटणीस संजय किसनराव केनेकर यांना विधानपरिषदेची उमेदवारी दिली आहे. भाजपाचे आमदारांची संख्या बघता केनेकर व आणखी दोन उमेदवार संदीप दिवाकरराव जोशी, दादाराव यादवराव केचे यांना भाजपाने उमेदवारी दिली आहे.
संजय केनेकर यांचा राजकिय प्रवास संघर्षमय राहिलेला आहे. त्यांच्या राजकीय परिचयावर नजर टाकूया. त्यांचे शिक्षण बी काॅम पदविधर झाले आहे. अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेत एक वर्ष काम करण्याची संधी मिळाली. भाजपाचे युवा मोर्चा ते प्रदेश उपाध्यक्ष जवळपास 12 वर्ष कार्यरत. नगरसेवक म्हणून तीनदा निवडून आले. वयाच्या 23 व्या वर्षी उपमहापौर पदी विराजमान झाले होते. औरंगाबाद महापालिकेत गटनेता म्हणून काम केले. भारतीय बहुजन कामगार संघ या संघटनेत संस्थापक अध्यक्ष म्हणून महाराष्ट्रात विविध क्षेत्रात 52 ठिकाणी संघटनेचे युनियन स्थापन करुन 32 हजार सभासद संख्या युनियन अंतर्गत नोंदवून घेतली. औरंगाबाद जिल्हा क्रीकेट असोसिएशनच्या माध्यमातून सदस्य म्हणून शहरातील होतकरू खेळाडूंना प्राधान्य देऊन तसेच त्यांच्या कलागुणांना ओळखून त्यांना योग्य न्याय मिळवून दिला. जनहित बहुउद्देशीय प्रसारक मंडळात संस्थापक अध्यक्ष म्हणून शहरातील विविध सामाजिक कार्यात हिरीरीने सहभाग घेतला. समर्थ प्रतिष्ठान युवक कल्याण मध्ये संस्थापक अध्यक्ष म्हणून अविरत कार्यरत. ग्रामविकास दलचे संस्थापक अध्यक्ष म्हणून ग्रामीण भागातील विविध शैक्षणिक, सामाजिक आर्थिक या दृष्टीने शेतकरी स्वावलंबी बनावे यासाठी सदैव प्रयत्न. नितीन गडकरी यांनी 2008 मध्ये भारतीय जनता पार्टी कामगार आघाडी स्थापन केली या आघाडीचे सन 2008 ते 2010 पर्यंत प्रदेश सरचिटणीस म्हणून कार्यरत होते. भारतीय जनता पार्टी कामगार आघाडीत प्रदेश अध्यक्ष म्हणून 6 वर्ष(दोन टर्म) कार्यरत होते. भाजपाच्या शहर जिल्हा अध्यक्ष असताना कोरोना काळात सरकारच्या विरोधात अक्रामकपणे आंदोलन केले होते. यामुळे त्यावेळचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी सन्मानित केले होते. म्हाडाच्या सभापती म्हणून काम केले. सध्या भारतीय जनता पार्टीत प्रदेश सरचिटणीस(महामंत्री) म्हणून कार्यरत आहे. या विधानपरिषद निवडणुकीत त्यांचा विजय निश्चित मानला जात आहे.
What's Your Reaction?
 
                    
                
 
                    
                
 
                    
                
 
                    
                
 
                    
                
 
                    
                
 
                    
                
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
                                                                                                                                             
                                                                                                                                             
                                                                                                                                             
                                             
                                             
                                             
                                             
                                             
                                             
                                             
                                             
                                            