आदर्श नंतर अजिंठा को.बँकेच्या खातेदारांच्या डोळ्यात अश्रू...मोंढा शाखेत खातेदारांची गर्दी
आदर्श नंतर अजिंठा को.बँकेच्या खातेदारांच्या डोळ्यात अश्रू... मोंढा शाखेत खातेदारांची गर्दी...
आरबीआयने निर्बंध लावल्याने 35 आदर्श नंतर अजिंठा को.बँकेच्या खातेदारांच्या डोळ्यात अश्रू... मोंढा शाखेत खातेदारांची गर्दी...चारशे कोटींची गुंतवणूक असल्याची डि-24 न्यूजला मिळाली माहिती...एक रुपयाही खातेदारांचा बुडणार नाही... बँकेचे शाखा व्यवस्थापक चेतन गादीया यांनी दिली शास्वती... आदर्श पतसंस्थेसारखा घोटाळा तर झाला नाही ना यासाठी खातेदारांनी माहिती घेण्यासाठी येथे गर्दी केली होती तर हा घोटाळा नाही निर्बंध आहेत...शंका दूर करण्यासाठी खातेदार माहिती घेत पैसे परत करण्याची मागणी करत होते...या निर्बंधांमुळे खातेदारांची कोट्यावधींची रक्कम अडकली आहे...
औरंगाबाद, दि.30(डि-24 न्यूज) आज रक्षाबंधनाच्या दिवशी अजिंठा को.बँकेवर आरबीआयने 6 महीन्यांसाठी निर्बंध लावल्याने खातेदार महीला बघिणींच्या डोळ्यात अश्रू आल्याने अंगावर काटे उभे राहिले. आज सकाळपासून मोंढ्याच्या शाखेत खातेदारांची गर्दी जमा असलेल्या रक्कम काढण्यासाठी जमा झाली होती. तांत्रिक कारणामुळे निर्बंध लावल्याने खातेदारांची पैसे परत मिळण्यास काही महीन्यांचा कालावधी लागणार आहे. अगोदरच आदर्श पतसंस्थेच्या घोटाळ्यातून हजारो खातेदार सावरले नाही त्यानंतर अजिंठा को.बँकेच्या 35 हजार खातेदारांना धक्का बसला आहे. जीवनभराची परिश्रमाची रक्कम अनेक खातेदारांची अडकल्याने हवालदील झाले आहे. तांत्रिक कारणामुळे निर्बंध लावल्याने काही दिवसांचा कालावधी लागणार आहे खातेदारांनी धीर धरावा घाबरण्याचे कारण नाही. व्यवस्थापकीय संचालक मंडळ हे निर्बंध उठवण्यासाठी प्रयत्न करत आहे. खातेदारांचा एक रुपयाही बूडणार नाही. ज्या खातेदारांची पाच लाखांची रक्कम गुंतवणूक केली आहे त्यांनी उद्यापासून अर्ज भरुन घेतले जातील इन्शुरन्स असल्याने ती रक्कम लवकरच मिळवून देण्यासाठी प्रयत्न केले जातील. शहरात दोन शाखा आहेत 35 हजार खातेदारांची चारशे कोटींची गुंतवणूक केली आहे. लवकरच आरबीआयचे निर्बंध उठतील व बँकेचे व्यवहार सुरळीत सुरू होतील असा विश्वास शाखा व्यवस्थापक चेतन गादीया यांनी व्यक्त केला आहे.
श्रीमती संगीता मुंदडा यांनी यावेळी डी-24 न्यूजला माहिती देताना सांगितले माझ्या पतीचे निधन झाले आहे मुले लहान आहे माझ्या खात्यात साडेतीन लाख रुपये आहे. आरबीआयने निर्बंध लावल्याने मला धक्का बसला. माझ्या मुलांचे भवितव्य या पैशावर अवलंबून आहे म्हणत हि महीला अक्षरशः रडत होती. संगिता सुनील खराडकर, राधाबाई कपाले, सुनिल खराडकर, प्रविण कपाले यांचेही या शाखेत मागिल पंधरा वर्षांपासून खाते उघडले आहे. लाखो रुपये खात्यात जमा असल्याने पैसे परत मिळावे यासाठी येथे आले असता पैसे मिळण्यास काही महीन्यांचा कालावधी लागेल असे येथील अधिकारी कर्मचाऱ्यांनी सांगितले. सुमनबाई पुंडलिक तायडे यांनी घर विकल्यानंतर बारा लाख रुपये आपल्या खात्यात जमा केले. फिक्स डिपाॅझिट केले आहे रकमेवर व्याज मिळत असल्याने कुटुंबाचा उदरनिर्वाह चालतो असे सांगितले. अशाच प्रकारे शेकडो खातेदारांची गर्दी येथे झाली होती. त्यांना फक्त पैसे परत मिळतील असे आश्वासन मिळाले पण कधी मिळणार तारीख सांगितली नसल्याने ते हवालदील झाले आहे. एका खातेदाराने तर पैसे परत मिळावे या मागणीसाठी अंगावर राकेल टाकून घेतले असल्याची माहिती सुत्रांनी दिली आहे. त्या व्यक्तीला उपस्थितांनी पकडले व समजूत काढली असल्याचे समजले. काँग्रेसचे माजी आमदार सुभाष झांबड हे या बँकेचे चेअरमन आहे. त्यांनीही माध्यमांना सांगितले आहे एकाही खातेदारांची रक्कम बुडणार नाही अशी शास्वती दिली आहे असे शाखा व्यवस्थापक चेतन गादीया यांनी यावेळी सांगितले.
आरबीआयने अजिंठा अर्बन को-ऑपरेटिव्ह बँकेच्या सर्व प्रकारच्या व्यवहारांवर निर्बंध घातले आहे. 29 ऑगस्ट पासून हे निर्बंध लावल्याने खळबळ उडाली आहे. सहा महिन्यांसाठी हे निर्बंध असतील. असे आरबीआयने अधिकृत पत्राद्वारे जाहीर केले आहे. नव्या निर्देशानुसार यापुढे कुठल्याही लेखी मंजूरीशिवाय कोणत्याही कर्जाचे वाटप, नूतनीकरण करु शकणार नाही. नवीन ठेवीचा स्विकार वितरितही करु शकणार नाही, बँकेला मालमत्ता विकता किंवा हस्तांतरित करता येणार नाही, हे निर्बंध सहा महिन्यांसाठी लागू असतील. बँकेचा आरबीआयने परवाना रद्द केलेला नाही. केवळ आर्थिक निर्बंध आणले आहेत. बँकेच्या उपरोक्त परिस्थिती नुसार आरबीआय निर्बंधात बदल करु शकते असेही पत्रात म्हटले आहे.
What's Your Reaction?