लोकसंवादाद्वारे अशोक चव्हाण आणि वडेट्टीवार जाणार जनतेच्या दारी...!
लोकसंवादाद्वारे अशोक चव्हाण आणि वडेट्टीवार जाणार जनतेच्या दारी...
3 सप्टेंबर पासून जिल्ह्यात लोकसंवाद यात्रा, अशोक चव्हाण येणार
औरंगाबाद, दि.29(डि-24 न्यूज) महागाई, बेरोजगारी, शेतकऱ्यांचा मालाला भाव नाही, मराठवाड्यात कमी पावसामुळे शेतकरी हवालदील झाले आहे तरीही सरकारची मदत मिळत नाही, विरोधकांवर ईडी आणि सिबिआयच्या कार्यवाही करुन त्रास दिला जात आहे. केंद्र व राज्य सरकारवर जनतेत असंतोष निर्माण झाला आहे. या सर्व बाबी जनतेसमोर आणण्यासाठी जिल्ह्यात लोकसंवाद यात्रा 3 सप्टेंबर पासून काँग्रेसच्या वतीने काढण्यात येणार आहे. 13 सप्टेंबर पर्यंत हि यात्रा प्रत्येक तालुक्यात व शहरात जाऊन काँग्रेसचे नेते जनतेशी संवाद साधणार आहेत. या लोकसंवाद यात्रेचे प्रमुख माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण आहेत. ते या यात्रेत दोन दिवसाचा दौरा करुन संवाद साधणार आहे. प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, विरोधीपक्षनेते विजय वडेट्टीवार व राज्यातील वरिष्ठ नेते यात्रेत सहभागी होऊन जनतेशी संवाद साधणार आहेत. रथ, बस व विविध प्रकारचे वाहनात लोकसंवाद यात्रा प्रत्येक तालुक्यात दोन दिवस दौरा करणार आहे. जनतेच्या अडी अडचणी समजून घेणार असल्याची माहिती पत्रकार परिषदेत जिल्हाध्यक्ष डॉ.कल्याण काळे यांनी दिली आहे.
यावेळी प्रभारी एड मुजाहेद खान, शहराध्यक्ष युसुफ शेख, प्रदेश सचिव नामदेव पवार, सेवादलचे प्रदेशाध्यक्ष विलास औताडे आदी उपस्थित होते.
What's Your Reaction?