रेल्वे स्टेशनवर उर्दूमध्ये फलकाची मागणी, एसडिपिआयचा अराजकता पसरवण्याचा प्रयत्न - आमदार संजय केनेकर

 0
रेल्वे स्टेशनवर उर्दूमध्ये फलकाची मागणी, एसडिपिआयचा अराजकता पसरवण्याचा प्रयत्न - आमदार संजय केनेकर

रेल्वे स्टेशनवर उर्दूमध्ये फलक, एसडिपिआयचा अराजकता पसरवण्याचा प्रयत्न - भाजपा आमदार संजय केनेकर

नागपूर येथे सुरू हिवाळी अधिवेशनात एसडिपिआयवर कार्यवाई करण्यासाठी आणला स्थगन प्रस्ताव...

छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद), दि.11(डि-24 न्यूज) - रेल्वे स्थानकाचे नामांतर छत्रपती संभाजीनगर करण्याचा रेल्वे विभागाने निर्णय घेतला यानंतर फलकावर मराठी, इंग्रजी व उर्दू भाषेत फलक लावण्यात आले होते परंतु उर्दू भाषेतील फलक हटवा अशी मागणी भाजपाचे विधानपरिषद सदस्य संजय केनेकर यांनी केल्यानंतर ते हटवल्याने एसडिपिआय (सोशल डेमोक्रॅटिक पार्टी ऑफ इंडिया) च्या वतीने पुन्हा उर्दू भाषेत छत्रपती संभाजीनगर रेल्वे स्टेशन असे फलक लावण्यासाठी रेल्वे रोको आंदोलनाचा प्रयत्न केला. पोलिसांनी रेल्वे रोको आंदोलन न होऊ देता कार्यकर्त्यांना ताब्यात घेतले. यावेळी भाजपाचे आमदार संजय केनेकर यांच्यावर एसडिपिआयच्या नेत्याने टिका केली यानंतर संजय केनेकर चांगलेच भडकले. त्यांनी हिवाळी अधिवेशनात स्थगन प्रस्ताव आणून त्या कार्यकर्त्यांना अटक व्हावी, त्यांनी माझ्यावर व माझ्या परिवारावराला धमक्या दिल्या. एसडिपिआय धार्मिक अराजकता पसरवण्याचा प्रयत्न करत आहे. शहराचे नाव छत्रपती संभाजीनगर करण्यास एकीकडे विरोध करायचा आणि तोच नाव रेल्वे स्थानकाच्या फलकावर उर्दूत लिहायची मागणी करायची. हि एसडिपिआयची नौटंकी आहे. उद्या हे कार्यकर्ते शहरातील पाट्या उर्दूमध्ये लिहायला सांगतील हि हुकुमशाही सहन करणार नाही. नोटीफिकेशनमध्ये मराठी, हिंदी, इंग्रजी भाषेत फलकावर नाव लिहायचे होते काही अधिका-यांमध्ये अजूनही निजाम गेला नाही, त्या अधिका-यांची चौकशी लावली आहे. असे म्हणत केनेकरांनी टिका केली. 

त्यांनी पुढे सांगितले मराठवाड्याचा अनुशेष अजून बाकी आहे. स्व.बाळासाहेब ठाकरे यांची नामांतराची इच्छा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पूर्ण केली.

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow