लोकसभा निवडणुकीपूर्वी एमआयएमला धक्का, डॉ.शोएब हाश्मी शिवसेनेत...!

 0
लोकसभा निवडणुकीपूर्वी एमआयएमला धक्का, डॉ.शोएब हाश्मी शिवसेनेत...!

एमआयएमला धक्का...

डॉ.शोएब हाश्मींचा उद्या शिवसेनेत प्रवेश

मागच्या विधानसभा निवडणुकीत औरंगाबाद मध्य विधानसभा मतदारसंघातून एमआयएम कडून होते इच्छुक, विरोधीपक्षनेते अंबादास दानवे यांच्या प्रमुख उपस्थितीत मातोश्रीवर करणार ठाकरे गटात प्रवेश, मिळणार मोठी जवाबदारी...

औरंगाबाद, दि.5(डि-24 न्यूज) शहरातील नामांकित डॉक्टर शोएब हाश्मी हे उद्या शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली मातोश्री येथे शिवसेनेत मातोश्रीवर पक्षप्रवेश करणार असल्याने एमआयएमला लोकसभा निवडणुक पूर्वी धक्का असल्याचे मानले जात आहे. मागिल विधानसभा निवडणुकीत डॉ.हाश्मी हे मध्य विधानसभा मतदारसंघातून इच्छुक होते परंतु त्यांना उमेदवारी मिळाली नसल्याने तेव्हापासून ते नाराज होते. हाश्मी नेहमी सामाजिक कार्यात अग्रेसर असतात एमआयएमच्या माध्यमातून त्यांनी राजकारणात इंट्री केली होती. त्यांचे सर्व राजकीय पक्षांच्या नेत्यांसोबत चांगले संबंध आहेत. नामांकित डॉक्टर म्हणून ओळख आहे. मागिल वर्षी विरोधीपक्षनेते अंबादास दानवे यांच्यासोबत उध्दव ठाकरे यांची त्यांनी भेट घेतली होती. राज्यातील अल्पसंख्याक समाजाचे प्रश्न व विविध विषयांवर सविस्तर चर्चा झाली होती. राज्यातील मुस्लिम समाज हा उध्दव ठाकरे यांच्या शिवसेनेसोबत जोडला जात आहे. कोरोना काळातील मुख्यमंत्री असताना त्यांनी केलेल्या कामामुळे अल्पसंख्याक समाज प्रभावित झाला होता. राज्यातील राजकीय घडामोडी बघता हा समाज मोठ्या अपेक्षेने बघत आहे. 

उद्या दुपारी मुंबईत मातोश्रीवर दुपारी 12.30 वाजता एशियन हाॅस्पीटलचे संचालक डॉ.शोएब हाश्मी पैठणचे माजी नगराध्यक्ष दत्ता गोर्डे, वैजापूर येथील डॉ.राजू डोंगरे यांचा शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या हस्ते शिवबंधन बांधून पक्षप्रवेश होणार असल्याची माहिती डि-24 न्यूजला विरोधीपक्षनेते अंबादास दानवे यांनी दिली आहे.

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow