पोलीस भरतीत 812 उमेदवारांची दांडी, उमेदवारांना रेल्वेस्टेशन, बसस्थानकात काढावी लागली रात्र...!

 0
पोलीस भरतीत 812 उमेदवारांची दांडी, उमेदवारांना रेल्वेस्टेशन, बसस्थानकात काढावी लागली रात्र...!

पोलीस भरतीत 812 उमेदवारांची दांडी...! रेल्वेस्टेशन व बसस्थानकात काढावी लागली रात्र...!

छ.संभाजीनगर(औरंगाबाद)दि.19(डि-24 न्यूज)

पोलीस भरतीला आजपासून सुरुवात झाली आहे. जागा कमी व अर्जदारांची संख्या जास्त असल्याने बेरोजगारी किती वाढत आहे यावरून दिसून येत आहे. आज पहिल्याच दिवशी पोलिस भरतीसाठी चांगला प्रतिसाद मिळाला. शहर पोलिस व ग्रामीण पोलिस प्रशासनाने भरती प्रक्रीयेसाठी नियोजन केले होते. बाहेर गावाहून आलेले काही उमेदवारांना राहण्याची सोय नसल्याने रेल्वे स्टेशन, बसस्थानकात रात्र काढावी लागली. 

शहर पोलिस आयुक्तालयाच्या अस्थापनेवरील रिक्त पदांसाठी भरती प्रक्रिया राबविण्यात आली. पहिल्याच दिवशी 2100 उमेदवारांना शारिरीक चाचणी, मैदानी चाचणीला बोलवण्यात आले. 1288 उमेदवार हजर झाले. पोलिस भरतीमध्ये पहिल्याच दिवशी तब्बल 812 उमेदवार गैरहजर राहिल्याची माहिती समोर आली.

शहर पोलिस आयुक्तालयाअंतर्गत विभागीय क्रीडा संकुल येथे आज रोजी भरती प्रक्रियेला सुरवात करण्यात आली. या भरती अंतर्गत शहर पोलिस आयुक्तालयात आस्थापनेवरील रिक्त असलेल्या 212 पोलिस शिपाई आणि मध्यवर्ती कारागृह, हर्सुल विभागातील 315 कारागृह शिपाई भरती राबविण्यात येत आहेत. ही भरती प्रक्रिया राबविण्यासाठी पोलिस आयुक्त संदिप पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपायुक्त शिलवंत नांदेडकर व पोलिस अधिकारी यांच्या वतीने नियोजन करण्यात आले आहे. या दोन्ही पदांसाठी अनुक्रमे 16 हजार 133 आणि 70 हजार 333 असे एकुण 86 हजार 486 उमेदवारांचे अर्ज आलेले आहेत. या उमेदवारांची मैदानी चाचणी आज पहाटे 5 वाजेच्या दरम्यान सूरू करण्यात आली आहे. पहाटे पाच वाजेच्या दरम्यान उमेदवारांना क्रीडा संकुल मैदानात घेण्यात आले.

या उमेदवारांची बायोमॅट्रीक हजेरी घेण्यात आली. तसेच शारिरीक चाचणी घेण्यात आली. यात पात्र उमेदवारांना गोळा फेक, 1600 मिटर धावणे, 100 मिटर धावणे अशा विविध स्पर्धेत समुहाने पाठविण्यात आले. याशिवाय इतर प्रक्रियाही पार पाडण्यात आली. ही प्रक्रिया पुर्ण करण्यासाठी पहिल्या दिवशी उशिर झाला होता.

पहाटे पाच वाजेपासून मैदानात आलेल्या उमेदवारांच्या शारिरीक चाचणीसह मैदानी चाचणी होण्यासाठी दुपारी 2 वाजेपर्यंतचा वेळ लागला. पहिल्याच दिवशी उशिरा प्रक्रिया राबविण्यासाठी काही प्रमाणात उशिर झाला. पहिल्या दिवशी तब्बल 812 उमेदवारांनी दांडी मारल्याची माहितीही समोर आली.

रेल्वे स्टेशन बस स्थानक आणि मैदानाच्या बाहेर काढली रात्र

पोलिस भरतीसाठी विविध भागातून आलेल्या उमेदवारांनी आपली रात्र, रेल्वे स्टेशन, बस स्थानक आणि मैदानाच्या बाहेर असलेल्या दुकानाच्या किंवा घरांच्या समोरच्या बाजुला रस्त्यावर काढावी लागली. मंगळवारी रात्री अनेक जण हे क्रीडा संकुलात पोहोचले होते. रात्री या उमेदवारांना बाहेर हाकलण्यात आले. यामुळे या उमेदवारांना रस्त्यावर रात्र काढावी लागली. भरतीच्या पुर्वीची रात्र कसे तरी काढलेल्या उमेदवारांना दुसऱ्या दिवशी शारिरीक व मैदानी चाचणी पुर्ण होईपर्यंत उपाशी राहावे लागले.

पोलिस अधिक्षक कार्यालयाने ‘आरपीआयडी’चा यशस्वी प्रयोग

ग्रामीण पोलिस अधिक्षक कार्यालयातंर्गत भरती परिक्षा सूरळीत...

ग्रामीण जिल्हा पोलिस दलाचे अस्थापनेवरील पोलिस शिपाई भरती भरतीची प्रक्रिया बुधवारी राबविण्यात आली. पोलिस अधिक्षक मनीष कलवानीया यांच्या नियंत्रणाखाली ही प्रकिया सुरू करण्यात आली. ही प्रक्रिया विनाविघ्न तसेच पारदर्शक पणे राबविण्यासाठी विशेष नियोजन करण्यात आले.

या अंतर्गत बुधवारी भरतीच्या पहिल्या दिवशी उमेदवारांची संपूर्ण नोंदणी ही बायोमेट्रिक स्कॅनच्या आधारे करण्यात येत असुन आरपीआयडी [ रेडीओ- फ्रिक्वेन्सी आयडेंटीफिकेशन] प्रणाली द्वारे त्यांचे चेस्टक्रमांकावर देण्यात आलेल्या बारकोडच्या माध्यमांतुन त्यांचा शंभर मी व 1600 मी.चा अचुक वेळ घेण्यात येवुन गुणांकन करण्यात आला आहे. यासह संपूर्ण मैदानाचा परिसरात CCTV कॅमेरे लावण्यात आले असुन संपूर्ण भरती प्रक्रीयचे चित्रीकरण करण्यात आले आहे. आज पुरुष उमदेवारांची शैक्षणिक पात्रता व मैदानी चाचणी सह संपूर्ण प्रक्रिया प्रक्रिया पारदर्शक व निःपक्षपणे पार पडण्यासाठी पोलिस अधीक्षक यांनी अत्यंत बारकाईने नियोजन केले. पोलिस अधीक्षक मनीष कलवानीया हे स्वतः भरती प्रक्रिया करिता मैदानावर उपस्थित होते. त्यांनी उमेदवारांचे तक्रारी तसेच आक्षेप यांचे निराकरण करून त्यांच्या समस्या या जागेवर सोडविले.

 

आज रोजी एकुण 1000 पुरूष उमेदवारांना चाचणीसाठी बोलविण्यात आले. एक हजार उमेदवारापैकी 638 उमेदवार हे शैक्षणिक व शारिरीक चाचणी करिता उपस्थित राहिले आहे. यामध्ये 106 उमेदवार हे अपात्र झाले असुन पात्र 532 उमेदवारांची यशस्वीरित्या मैदानी चाचणी परिक्षा घेण्यात आली.

भरती प्रक्रिये दरम्यान उमेदवारांना अस्वस्थता वाटल्यास अगर जखमी झाल्यास त्यांना तात्काळ उपचारकामी डॉक्टर टिम व रुग्णवाहिका उपलब्ध ठेवण्यात आली होते. तसेच पिण्याच्या पाण्यासह उमेदवाराकरिता अल्पोपहार, ओआरएस युक्त पाणी व्यवस्था करण्यात आली आहे. जेणे करून उमेदवारांना भरती प्रक्रियेमध्ये कोणताही त्रास होणार नाही. याची काळजी घेण्यात आली.

अमिषाला बळी पडू नका- पोलिस अधीक्षक मनिष कलवानिया...!

भरती प्रक्रिया पारदर्शकपणे राबविण्यात येत आहे. यामुळे कोणाच्याही भुलथापाना, आमिषाला, प्रलोभनाला बळी पडू नये. कोणीही भरती करून देतो असे आश्वासन देत असल्यास तात्काळ वरिष्ठ पोलिस अधिकारी तसेच नियंत्रण कक्ष, पोलिस अधीक्षक कार्यालय, छत्रपती संभाजीनगर ग्रामीण यांचे 0240-2381633, ,2392151, 9529613104 या क्रमांकावर संपर्क करावा. तसेच लाचलुचपत विभाग, छत्रपती संभाजीनगर यांचे कार्यालयीन हेल्पलाईन क्रमांक 1064 व 0240 – 2334045 9923023361, 9766557415 या क्रमांकावर संपर्क साधावा. असे आवाहन पोलिस अधिक्षक मनिष कलवानीया यांनी केले आहे.

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow