शहरातविजेचा लपंडाव सुरू, मंत्री अतुल सावे यांनी घेतली महावितरणची बैठक...!
मान्सून पूर्व प्रलंबित कामे मार्गी लावा मंत्री श्री सावे यांची महावितरण ला सूचना, पावसाळा सुरू होताच विजेचा लपंडाव सुरू असल्याने नागरीक त्रस्त झाले आहेत...तक्रारी वाढत असल्याने मंत्री अतुल सावे यांनी बैठक घेऊन महावितरणच्या अधिकाऱ्यांना आवश्यक सूचना दिल्या...
औरंगाबाद, दि.11(डि-24 न्यूज) पावसाळा सुरू होताच शहरात विजेचा लपंडाव सुरू झाल्याने वीज ग्राहक त्रस्त झाले आहेत. तक्रारी वाढत असल्याने मंत्री अतुल सावे यांनी महावितरणच्या अधिकाऱ्यांची बैठक घेऊन आवश्यक सूचना दिल्या. पावसाळ्यात पूर्वी महावितरण कडून करण्यात येणारी कामे मार्गी लागली नसल्याने राज्याचे गृहनिर्माण आणि इतर मागास बहुजन कल्याण मंत्री तथा पूर्व मतदार संघाचे आमदार श्री अतुल सावे यांनी मंगळवार (दि.11) रोजी महावितरण चे अधीक्षक शहर अभियंता यांच्या सह अधिकाऱ्यांची बैठक घेऊन सूचना केल्या.
ऐन पावसाळ्यात नागरिकांना विजेचा अडचणीचा सामना करावा लागतो. अशात सततच्या जाणाऱ्या विजे मुळे नागरिकांना अनेक गोष्टी साठी तोंड द्यावे लागते. पूर्व मतदार संघातील सिडको, गारखेडा आणि कैलास नगर मंडळातील विविध रखडलेल्या आणि मान्सून पूर्व कामांचा आढावा घेत अधिकारी यांना काम मार्गी लावून नागरिकांच्या अडचणी दूर करण्याच्या सूचना यावेळी मंत्री श्री अतुल सावे यांनी बैठकीत केली. यावेळी बैठकीत सिडको मधील विजेपुरवठा सुरळीत राहील यासाठी 33 kv चिकलठाणा सोबतच 33 kv हर्सूल जोडणी करूनसपोर्ट देण्यात यावा त्याच बरोबर 33kv मध्ये 4 ठिकाणी आयसोलेटर स्विच टाकण्यात यावा. लघुदाब वहिनीच्या केबल या अतिजिर्न झाल्या असून त्या बदलण्यात यावी. सिडको परिसरातील प्रमुख ट्रान्सफार्मर बदलून 200 kv क्षमतेचा करण्यात यावा. तसेच सर्व ठिकाणच्या dp जवळील संरक्षण भिंतीचे काम करण्यात यावी. कैलास नगर मधील विजेचे खांब तत्काळ स्थलांतरित करण्यात यावे. तसेच मान्सून पूर्व कामे झाली नसल्याने सारखी वीज जात आहे. अशा विविध प्रश्न ना कडे लक्ष वेधून अधिकाऱ्यांना कडक सूचना देण्यात आल्या याकडे गांभीर्याने लक्ष देऊन येणाऱ्या दिवसात हे प्रश्न लवकरात लवकर मार्गी लावण्यात यावे अशा सूचना देखील त्यांनी केल्या.
यावेळी शिवाजी दांडगे, लक्ष्मीकांत थेठे, नितीन खरात, विवेक राठोड, रामचंद्र जाधव, प्रशांत नांदेडकर, श्रीनिवास देव, अधीक्षक शहर अभियंता शांतीलाल चौधरी यांच्या सह अधिकारी यांची उपस्थिती होती.
What's Your Reaction?