मराठवाड्यात अतिवृष्टीत 104 व्यक्तींचा मृत्यू, 31 लाख 98 हजार 470 हेक्टरवरील पिकांचे नुकसान...
मराठवाड्यात अतिवृष्टीत 104 व्यक्तींचा मृत्यू, 31 लाख 98 हजार 470 हेक्टरवरील पिकांचे नुकसान...2838 जनावरे दगावली...
73.80 टक्के पंचनामे पूर्ण, 1421 कोटी नुकसानभरपाई देण्यासाठी निधी प्राप्त, शेतकऱ्यांनी ई-केवायसी करुन घेण्याचे विभागीय आयुक्तांचे आवाहन...
छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद), दि.29(डि-24 न्यूज) अतिवृष्टीमुळे ग्रस्त मराठवाड्याला सोमवारी पाऊस झाला नसल्याने दिलासा मिळाला यामुळे प्रशासनालाही सुटकेचा श्वास घेतला. रात्रंदिवस अतिवृष्टीत प्रशासनातील अधिकारी-कर्मचारी, पोलिस यंत्रणा,एनडिआरएफ बाधितांच्या बचावकार्यासाठी झटत आहेत. काही लोक मदत केंद्रात आत्ताही निवारा घेत आहेत. मराठवाडा विभागात जून महिन्यात पावसाला सुरुवात झाली असली तरीही सप्टेंबर महिन्यात पावसाने कहर केला. गेल्या 3 महिन्यात मराठवाड्यात अतिवृष्टीमुळे 31 लाख 98 हजार 470 हेक्टर शेती पिकाचे नुकसान झाले आहे. आतापर्यंत अतिवृष्टीमुळे 104 व्यक्तींचा मृत्यू झाला असून 2 हजार 838 जनावरे दगावली आहेत. इतक्या मोठ्या प्रमाणात झालेल्या नुकसानीचे आतापर्यंत 73.80 टक्के पंचनामे पूर्ण झाले असून शासनाकडून 1421 कोटी निधी प्राप्त झाला आहे. हा निधी बाधित शेतकऱ्यांना मिळावा यासाठी तात्काळ पंचनामे करण्याची गरज असून बाधित शेतकऱ्यांची यादी ग्राम स्तरावर प्रसिद्ध करण्यात येणार आहे. यासाठी शेतकऱ्यांनी केवायसी करून घेणे आवश्यक असल्याचे विभागीय आयुक्त जितेंद्र पापळकर यांनी सांगितले.
जून महिन्यात पावसाला सुरुवात होत असली तरीही मराठवाड्यामध्ये जुलै महिन्यापर्यंत सरासरीपेक्षा पाऊस कमी झाला होता. त्यानंतर ऑगस्ट महिन्यात अनेकदा पावसाने दडी मारली. परंतु सप्टेंबर महिन्यात पावसाने मराठवाड्यातील सर्व जिल्ह्यात दमदार हजेरी लावत अक्षरशः कहर केला आहे. यात 27 व 28 सप्टेंबर दरम्यान, 330 मंडळामध्ये अतिवृष्टीची नोंद झाली आहे. या अतिवृष्टीमुळे मराठवाड्यातील 24 हजार 673 नागरिक पुरात अडकले होते यांना सुरक्षित स्थळी स्थलांतरित करण्यात आले आहेत. सोमवारी मराठवाड्यातील एकही मंडळात पाऊस नोंद झाली नाही. त्यामुळे मराठवाड्यात एका अर्थाने सोमवारी पावसाने दिलासा दिला असाला तरी आता बाधित झालेल्या शेतीची पंचनामे करण्याची मागणी शेतकऱ्यांकडून करण्यात येत आहे. जून ते ऑगस्ट दरम्यान नुकसानी बाबत शासनाकडून मागणीनुसार नीधी प्राप्त झाला आहे. नीधी डिबीटी प्रणालीद्वारे बाधित शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा करण्यात येणार आहे. शेतकऱ्यांनी याद्या प्रसिद्ध होताच त्वरीत ई-केवायसी करुन घ्यावी. असे आवाहन विभागीय आयुक्त जितेंद्र पापळकर यांनी केले आहे. पुढे त्यांनी सांगितले हि आपत्ती मदत असल्याने बँकांनी शेतकऱ्यांच्या कर्जात पैसे यातून काढून घेवू नये. काही बँकेत थेट कपातीबाबत यंत्रणा असते त्यामुळे शेतकऱ्यांनी देखील प्राप्त नुकसानभरपाई रकमेतून कर्जाची रक्कम कपात करु नये यासाठी बँकांना अर्ज करावे असे त्यांनी नमूद केले.
What's Your Reaction?