जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांनी घेतला मदत व बचाव कार्याचा आढावा...

जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला मदत बचाव कार्याचा आढावा...
सर्व यंत्रणांनी समन्वयाने मदतकार्य करा-जिल्हाधिकारी दिलीप स्वामी...
छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद), दि.29 (डि-24 न्यूज)- जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे मोठ्या प्रमाणात शेतीचे, घरांचे नुकसान झाले आहे. या भागात नागरिकांना सुरक्षित स्थळी हलवण्यात आले आहे. या ठिकाणी नागरिकांना जेवणाची सुविधा, पाणी तसेच आणि आरोग्याच्या सुविधा त्वरित उपलब्ध करून द्याव्या. त्यासाठी सर्व यंत्रणानी समन्वय राखवा, असे निर्देश जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांनी आज आढावा बैठकीत दिले.
जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांनी आज जिल्ह्यातील मदत व बचाव कार्याचा दूरदृष्य प्रणालीद्वारे आढावा घेतला. जिल्हाधिकारी कार्यालयातून जिल्हाधिकारी दिलीप स्वामी ,जिल्हा परिषदचे मुख्य कार्यकारी अधिकारी अंकित, निवासी उपजिल्हाधिकारी जनार्दन विधाते, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन कक्षाचे समन्वयक मारुती मस्के, पुनर्वसन विभागाचे उपजिल्हाधिकारी डॉ. निलेश अपार , जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी प्रकाश देशमुख सर्व उपविभागीय अधिकारी आणि सर्व तहसीलदार ,गटविकास अधिकारी, आरोग्य विभागाचे संबंधित अधिकारी उपस्थित होते.
जिल्हाधिकारी स्वामी यांनी निर्देश दिले की,
पूर परिस्थिती असलेल्या ठिकाणी नागरिकांना अन्नाची पाकिटे उपलब्ध करून देण्यासाठी जिल्हा प्रशासनाबरोबरच काही सामाजिक स्वयंसेवी संस्था मदत करण्यास इच्छुक आहेत. त्यांच्या मदतीने देखील नागरिकांना मदत करावी. या कालावधीमध्ये नागरिकांना पुरवठा विभागाने स्वस्त धान्य दुकानदारांमार्फत वेळेत अन्नधान्य पुरवठा करावा. ज्या ठिकाणी पूर परिस्थिती किंवा आपत्कालीन परिस्थिती निर्माण होऊ शकते अशा ठिकाणी आगाऊ मदत म्हणून जिल्हा आपत्ती व्यवस्थापन कक्षासोबत समन्वय साधून पूर्वतयारी म्हणून यंत्रणा सज्ज ठेवावी. तसेच या कालावधीत रोगराई निर्माण होऊ नये या साठी आरोग्य विभागाने साथ रोग नियंत्रण कार्यक्रम व आरोग्य सुविधा वेळेत पोहोचविण्यासाठी काम करावे, असे निर्देश जिल्हाधिकारी स्वामी यांनी संबंधितांना दिले.
What's Your Reaction?






