उद्या महापालिकेच्या वतीने कर समाधान शिबिर...

 0
उद्या महापालिकेच्या वतीने कर समाधान शिबिर...

महानगरपालिकेच्या वतीने उद्या कर समाधान शिबिर...

छत्रपती संभाजीनगर(औरंगाबाद), दि.23(डि-24 न्यूज) महानगरपालिकेच्या वतीने आयुक्त तथा प्रशासक जी श्रीकांत यांच्या संकल्पनेतून महानगरपालिका मुख्यालय येथे कर समाधान शिबिर आयोजीत करण्यात येत आहे.

 आयुक्त तथा प्रशासक जी श्रीकांत यांच्या निर्देशानुसार महानगरपालिकेच्या कार्यक्षेत्रातील मालमत्ताधारकांना त्यांचे मालमत्ता कराबाबत आक्षेप /तक्रारी निकाली काढण्यासाठी व त्यांचे शंकेचे निरसन होऊन त्यांना कराचा भरणा सुलभतेने होण्यासाठी आयुक्त तथा प्रशासक महानगरपालिका यांचे कडे दर महिन्याच्या दुसऱ्या व चौथ्या शुक्रवारी सकाळी 10 ते 12 या वेळेत महानगरपालिका मुख्यालय येथे कर समाधान शिबिर आयोजित करण्यात येत आहे. उद्या दि.24 जानेवारी रोजी या कर समाधान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.

   सदर शिबिरामध्ये सबंधित मालमत्ता धारकांना त्यांच्या कराबाबत आक्षेप /तक्रारी असल्यास सबंधित प्रशासकीय (झोन ) कार्यालय मध्ये अर्ज दाखल करून कर समाधान शिबिरात उपस्थित राहता येईल. तसेच जिल्हा विधी सेवा प्राधिकरण औरंगाबाद यांच्या वतीने पाच लांखावरिल थकीत मालमत्ता कर धारकांना याबाबत नोटीस पाठवण्यात आली आहे. अशा नोटीस प्राप्त मालमत्ता धारक उद्या कर समाधान शिबिरात आपले म्हणणे मांडू शकतात. अशी माहिती उप आयुक्त 2 (कर) अपर्णा थेटे यांनी प्रशासनाच्या वतीने केले आहे. करिता जास्तीत जास्त नागरिकांनी याचा लाभ घ्यावा असे महापालिकेकडून आवाहन करण्यात येत आहे.

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow