50 टक्के बेटरमेंट चार्जेसची सवलत आता 31 डिसेंबर पर्यंत
50% बेटरमेंट चार्जेसची सवलत आता 31 डिसेंबर पर्यंत
छत्रपती संभाजीनगर(औरंगाबाद), दि.26(डि-24 न्यूज) महानगरपालिका क्षेत्रातील अनाधिकृत वसाहतीमधील मिळकत धारकांना आता 31 डिसेंबर 2024 पर्यंत 50% सवलती मध्ये बेटरमेंट चार्जेस भरता येणार आहे.
महाराष्ट्र गुंठेवारी विकास अधिनियम 2001 (सुधारणा) 2021 नुसार गुंठेवारी नियमितीकरणासाठी 200.00 चौ.मी क्षेत्रा पर्यंतच्या निवासी वापराच्या मिळकतीसाठी फक्त विकास आकार (Betterment Charges) मध्ये 50 टक्के सवलत देणे बाबत ठराव क्र.1357/2024 दि. 13.03.2024 नुसार पारित करण्यात आलेला आहे. ही सवलत दि.30.09.2024 पर्यंत देण्यात आलेली आहे. सदर सवलत दि.30.09.2024 रोजी संपुष्टात येत आहे. या संदर्भात मिळकत धारकाचा वाढता प्रतिसाद पाहता, मिळकत धारकांना नियमीतीकरणाचे प्रस्ताव दाखल करणेसाठी प्रोत्साहित करणेच्या उद्देशाने आयुक्त तथा प्रशासक जी श्रीकांत यांच्या आदेशानुसार 200 चौ.मी. पर्यंतच्या क्षेत्राच्या निवासी वापराच्या भुखंडासाठी विकास आकारामध्ये (Beterment Charges) देण्यात आलेली 50 टक्के सवलत ही दि 31.12.2024 पर्यंत वाढविण्यात येत आहे.
करीता गुंठेवारी वसाहतीमधील मिळकत धारकांना जाहीर आवाहन करण्यात येते की, त्यांनी आपल्या भूखंडाचे / भूखंडासहीत बांधकामाचे प्रस्ताव दि 31.12.2024 पर्यंत महानगरपालिकेच्या गुंठेवारी विभागात सादर करावेत. जे मिळकत धारक नियमीती करणासाठी आपले प्रस्ताव सादर करणार नाहीत, अशा मिळकत धारकांवर महाराष्ट्र प्रादेशिक नियोजन व नगर रचना अधिनियम 1966 चे कलम 260 अन्वये अनाधिकृत बांधकाम निष्काषीत करण्याची कार्यवाही करण्यात येईल.
असे अतिरिक्त आयुक्त रणजित आ. पाटील यांनी कळविले आहे.
What's Your Reaction?