इंटरनेटच्या जाळ्यातून नवीन पिढीला पुस्तकेच काढू शकतात - प्रा.मच्छींद्र चाटे

इंटरनेटच्या जाळ्यातून युवकांना फक्त पुस्तकेच बाहेर काढतील-प्रा.मच्छिंद्र चाटे
औरंगाबाद, दि.10आजची तरुण पिढी फेसबुक,इन्स्टा, एक्स, व्हाट्सएप, इंटरनेटच्या मोहजाळात पुरती अडकली आहे यामुळे आजची पिढी पुस्तकांपासून दूर होऊन जीवनात आवश्यक ज्ञान कमी होत आहे, त्यांना या मायाजाळातून बाहेर काढण्याचे काम वाचन संस्कृतीच करेल " वाचाल तर वाचाल " ही उक्ती तंतोतंत खरी असल्याचा विश्वास ख्यातनाम चित्रपट निर्माते व चाटे शैक्षणिक समूहाचे अध्यक्ष श्री.प्रा.मच्छिंद्र जी चाटे यांनी व्यक्त केला.
मराठवाड्यातील सुप्रसिद्ध कवी व लेखक केशव काळे यांचे आत्मचरित्र " होय ! हे असंच आहे " या आत्मचरित्राचे व हरिवंशराय बच्चन यांची गाजलेल्या " मधुशाला " या कलाकृतीचा मराठी अनुवादाची चौथी आवृत्तीचा प्रकाशन
सोहळा मौलाना आझाद संशोधन केंद्रात आयोजित कार्यक्रमात बोलत होते.
अतिशय भव्यदिव्य अशा प्रकाशन सोहळ्याच्या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शासकीय विद्या निकेतनचे विद्यार्थी प्रिय सेवानिवृत्त शिक्षक मा. मानसिंगराव पाटील हे आवर्जून उपस्थित होते.
आपण आपले जीवनातील अनुभव लिहायलाच हवेत. आगामी पिढीला ते दिशा दाखवण्याचे काम करतील. केशव काळे यांनी लिहिलेले त्यांचे अनुभव हे त्यांचे नसून थोड्या फार फरकाने आपणा सर्वांचेच आहेत. हा ठेवा पुढील पिढीसाठी जपून ठेवायला हवा.
थिंक पाॅझिटीवचे संपादक यमाजी मालकर यांनी आपल्या खुमासदार शैलीत भाष्य विशद केले. त्यांनी आत्मचरित्रात लिहलेले किस्से सांगताना प्रेक्षकांत हसु फुलले. लेखक, लेखन, साहित्य व वाचन संस्कृती वाढवण्यासाठी प्रयत्न करण्याची आवश्यकता आहे यावर त्यांनी जोर दिला.
या कार्यक्रमासाठी राज्यातील कानाकोपऱ्यातून केशव काळेंवर प्रेम व्यक्त करणारे अनेक मित्र आवर्जून उपस्थित होते. यावेळी लहानपणाचे मित्र, चाहते, शुभचिंतक व नातेवाईक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
What's Your Reaction?






