अवलिया पत्रकार रहीम शेख हरपला, अखेरचा निरोप देण्यासाठी जनसमुदाय

 0
अवलिया पत्रकार रहीम शेख हरपला, अखेरचा निरोप देण्यासाठी जनसमुदाय

अवलिया पत्रकार रहीम शेख हरपला, अखेरचा निरोप देण्यासाठी जनसमुदाय

औरंगाबाद, दि.25(डि-24 न्यूज) अवलिया पत्रकार रहीम शेख पाशा, वय 54, निवासी रोशनगेट यांचे हृदयविकाराच्या झटक्याने अकाली निधन झाल्याने पत्रकारिता क्षेत्रात शोककळा पसरली. 

मागिल 17 वर्षांपासून दैनिक सामना वृत्तपत्रात ते कार्यरत होते. क्राईम बिट त्यांचा आवडता विषय असायचा. सामनाच्या अगोदर त्यांचे जीवलग मित्र स्व.जेष्ठ पत्रकार शेख जलिल यांचे सोबत हिंदी दैनिक लोकमान्य वार्ता चालवले. त्यांच्या निष्पक्ष लेखनी सर्वांना परिचित आहे. मनमिळावू स्वभावामुळे रहीम भाई सर्वांना हवे हवेसे होते. सर्व माध्यम क्षेत्रातील व राजकीय पक्षांच्या नेत्यांशी, अधिका-यांशी त्यांचे चांगले संबंध होते. अचानक त्यांच्या निधनाची बातमी सोशल मीडियावर धडकली आणि सर्वांना धक्का बसला. गंजेशहीदा मस्जिदमध्ये आज गुरुवारी दुपारी दोन वाजता नमाज-ए-जनाजा संपन्न झाली. दफनविधी गंजेशहीदा कब्रस्तानात करण्यात आला. अखेरचा निरोप देण्यासाठी सर्व राजकीय व सामाजिक संघटनेचे, सर्व दैनिक व माध्यम समूहातील, नातेवाईक मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी सहकारी पत्रकारांच्या डोळ्यात अश्रू अनावर झाले व त्यांनी सांगितले अवलिया आणि निर्भिड पत्रकार हरपला अशी भावना व्यक्त केली.

त्यांच्या पश्चात आई, पत्नी, 5 भाऊ, दोन मुले, तीन मुली, नाती पोती असा मोठा परिवार आहे.

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow