विधानसभा निवडणुकीवर भाजपाच्या कोअर कमिटीच्या बैठकीत चर्चा...!

 0
विधानसभा निवडणुकीवर भाजपाच्या कोअर कमिटीच्या बैठकीत चर्चा...!

भाजपाच्या कोअर कमेटीची बैठक मुंबईत संपन्न 

मुंबई, दि.20(डि-24 न्यूज)

भारतीय जनता पार्टी प्रदेश कोअर कमिटीची दोन दिवसीय बैठक भाजपा प्रदेश कार्यालय, मुंबई येथे महाराष्ट्र प्रभारी तथा केंद्रीय मंत्री श्री.भूपेंद्र यादवजी आणि सहप्रभारी तथा केंद्रीय मंत्री श्री. अश्विनी वैष्णवजी तसेच सह संघटन मंत्री शिवप्रकाश यांच्या नेतृत्वाखाली उपमुख्यमंत्री श्री. देवेंद्रजी फडणवीस आणि प्रदेशाध्यक्ष श्री. चंद्रशेखर बावनकुळे यांच्या प्रमुख उपस्थितीत भाजपा महाराष्ट्र कोअर कमिटीची बैठक पार पडली.

आगामी काळात येणाऱ्या विधानसभा निवडणुका संदर्भात सखोल आणि धोरणात्मक चर्चा यावेळी बैठकीत करण्यात आली.

यावेळी राष्ट्रीय सरचिटणीस श्री.विनोद तावडे, राष्ट्रीय सचिव सौ. पंकजाताई मुंडे, भाजप नेते माजी केंद्रीय मंत्री श्री.रावसाहेब दानवे पाटील, राष्ट्रीय सचिव सौ.विजयाताई रहाटकर, राज्याचे मंत्री श्री.गिरीश महाजन, 

राज्याचे मंत्री श्री.सुधीर भाऊ मुनगंटीवार , केंद्रीय मंत्री श्रीमती रक्षाताई खडसे , केंद्रीय मंत्री श्री मुरलीधर मोहोळ, राज्याचे मंत्री श्री.चंद्रकांत दादा पाटील, भाजपा प्रदेश सरचिटणीस श्री संजय केणेकर, खासदार श्री.अशोक चव्हाण, खासदार डॉ.भागवत कराड आदी उपस्थित होते.

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow