पूर्व विधानसभा मतदारसंघातून काँग्रेसचे चार दिग्गज मुस्लिम नेते इच्छुक, कोणाला मिळेल संधी...!

 0
पूर्व विधानसभा मतदारसंघातून काँग्रेसचे चार दिग्गज मुस्लिम नेते इच्छुक, कोणाला मिळेल संधी...!

पूर्व विधानसभा मतदारसंघातून काँग्रेसचे चार मुस्लिम नेते इच्छुक...!

विधानपरिषदेची उमेदवारी मिळाली नसल्याने नाराजी...

छ.संभाजीनगर(औरंगाबाद) दि.20(डि-24 न्यूज) आगामी विधानसभा निवडणुकीची काँग्रेसच्या वतीने जोरदार तयारी सुरू झाली आहे. 288 जागेवर इच्छूक उमेदवारांकडून अर्ज मागवले जात आहे. औरंगाबाद पूर्व व औरंगाबाद मध्य हे विधानसभा मतदारसंघात मुस्लिम मुस्लिम बहुल असल्याने इच्छूकांची संख्या वाढत आहे. 31 ऑगस्ट पर्यंत इच्छूक उमेदवारांकडून अर्ज मागवले जाणार आहे. औरंगाबाद पूर्व विधानसभा मतदारसंघातून 4, औरंगाबाद मध्य विधानसभा मतदारसंघातून 8 तर औरंगाबाद पश्चिम विधानसभा मतदारसंघातून 11 इच्छूकांनी अर्ज घेतले आहे. औरंगाबाद पूर्व मधून अल्पसंख्याक विभागाचे प्रदेश उपाध्यक्ष तथा जेष्ठ नेते व अनुभवी नेते म्हणून परिचित इब्राहिम पठाण, प्रदेश महासचिव डॉ.जफर अहेमद खान, उच्चशिक्षित डॉक्टर सरताज पठाण, माजी शहर उपाध्यक्ष, माजी नगरसेवक शहागंज ब्लॉक अध्यक्ष असलेले माजीमंत्री राजेंद्र दर्डा यांचे समर्थक इब्राहिम पटेल हे दिग्गज मुस्लिम नेते या मतदारसंघातून निवडणूक लढण्यास इच्छुक आहेत. अशी माहिती डि-24 न्यूजला काँग्रेसचे शहर जिल्हाध्यक्ष युसुफ शेख यांनी दिली आहे. इच्छूकांनी मतदार संघात निवडणूकीची तयारी विविध सामाजिक उपक्रम हाती घेत सुरू केली आहे. महाविकास आघाडीत कोणत्या पक्षाला कोणता मतदार संघ सुटेल हे आता सांगता येणार नाही. विधानपरिषद निवडणुकीत काँग्रेसने मुस्लिम उमेदवार दिला नसल्याने टिका झाली होती. विधानपरिषदेत संधी मिळाली नाही विधानसभेत तरी जास्तीत जास्त मुस्लिम अल्पसंख्याक नेत्यांना प्रतिनिधित्व करण्याची संधी मिळेल का असा प्रश्न विचारला जात आहे.

शहरात विविध पक्ष व एमआयएमची ताकत जास्त आहे म्हणून काँग्रेस पक्षाने सक्षम उमेदवार देऊन महाविकास आघाडीत जागा निश्चित करावी अशी मागणी काँग्रेसच्या गोटातून होत आहे. जालना लोकसभा मतदारसंघातून काँग्रेसचे डॉ.कल्याण काळे विजयी झाल्यानंतर काँग्रेसच्या कार्यकर्त्यांमध्ये उत्साह वाढला असे यावरुन दिसून येत आहे.

काल मुंबईत काँग्रेस पक्षाची बैठक झाली यामध्ये 20 ऑगस्टला भारतरत्न राजीव गांधी यांच्या जयंतीनिमित्त काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे व काँग्रेसचे नेते तथा विरोधीपक्षनेते राहुल गांधी यांच्या उपस्थितीत विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराचा नारळ फोडणार आहे. राज्यात सर्वाधिक लोकसभेप्रमाणे जागा जिंकण्याचे टार्गेट काँग्रेसने ठेवले आहे.

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow