शहरात शिवसेनेची भव्य मशाल रैली, आमदार आदित्य ठाकरे यांची सरकारवर टीका...
शहरात मशाल रैली काढून शिवसेनेचे शक्ती प्रदर्शन
गद्दारीवर विजय मिळत पुन्हा फिनिक्स पक्षाप्रमाणे घेणार भरारी - आमदार आदीत्य ठाकरे
छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद), दि.26(डि-24 न्यूज)-
मशाल रैलीत आमदार आदीत्य ठाकरे यांनी कारच्या बोनटवर उभे राहुन सरकारवर कडाडून टीका केली.
आपण पाण्यासाठी मोर्चा काढला पाणी मिळाले का...? शेतकऱ्यांसाठी शिवसेनेने मोर्चा काढला. पालकमंत्र्यांचे व्हिडिओ येतात. पैसे दिसतात हे पैसे कूठून येतात. इथले खासदारांची कशाची दुकाने आहेत ते पैसे आता बाहेर येतील त्याला हात लावू नका, हे लोक फक्त लूटालूट करतात हे वसूलेबाज हप्तेबाज आहेत. ती शिवसेना नाही तर ती मिंधे चिंधि चोर टोळी आहे. कोणी तरी आपल्यात प्रवेश केला तर पालघरमध्ये साधू हत्याकांडातील प्रमुख आरोपी भाजपात का घेतला...? ते आधी सांगा नंतर आम्हाला प्रश्न विचारा. पाणी मागितले रस्ते मागितले हे सोडून ते भलते काही बोलतील हे म्हणतील मेट्रो देतो, यांना सांगा पाणी द्या नंतर बाकीचे बोला अशी टिका भव्य मशाल रैलीत आमदार आदीत्य ठाकरे यांनी केली.
शिवसेना - उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने युवासेनाप्रमुख, शिवसेना नेते, आमदार आदित्य ठाकरे यांच्या नेतृत्वात 26 डिसेंबर रोजी क्रांती चौक ते गुलमंडी पर्यंत भव्य मशाल रॅली सत्ताधाऱ्यांच्या मनात धडकी भरवणारी ठरली. या रॅलीला नागरिकांच्या उत्स्फूर्त प्रतिसादाने संपूर्ण परिसर शिवसेनामय झाला होता.
या मशाल रॅलीमध्ये शिवसेना पदाधिकारी, महिला आघाडी, युवासेना, युवतीसेना, इच्छुक उमेदवार, विविध अंगीकृत संघटनांचे कार्यकर्ते तसेच मोठ्या संख्येने सामान्य नागरिक सहभागी झाले होते. प्रत्येकाच्या हातात मशाल असून सत्ताधाऱ्यांच्या विरोधातील आक्रोश या रॅलीतून व्यक्त करण्यात आला.
ढोल-ताशांच्या गजरात “जय भवानी, जय जय शिवाजी”, “शिवसेना जिंदाबाद”, “बाळासाहेब जिंदाबाद” अशा जोरदार घोषणा देत कार्यकर्त्यांनी संपूर्ण परिसर दणाणून सोडला.“संभाजीनगर महानगरपालिकेवर शिवसेनेचा भगवा फडकवायचाच” असा निर्धार यावेळी घोषणांमधून स्पष्ट दिसून आला.
या रॅलीच्या समाप्तीनंतर संस्थान गणपतीची विधीवत आरती करून व श्रीफळ वाढवून प्रचाराचा शुभारंभ करण्यात आला.
सत्ताधाऱ्यांचा भ्रष्टाचार, सत्तेची मस्ती आणि पैशांचा माज नष्ट करण्यासाठी नागरिक रस्त्यावर उतरल्याचे चित्र यावेळी पाहायला मिळाले. मशालींच्या प्रकाशात अन्यायाविरोधातील लढ्याचा संदेश जनतेपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करण्यात आला.
ही मशाल रॅली म्हणजे आगामी महानगरपालिका निवडणुकित वातावरण भगवेमय झाले.
मशालींच्या प्रकाशात निघालेल्या या रॅलीमुळे शहरात लक्षवेधी वातावरण निर्माण झाले होते. आगामी महानगरपालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर शिवसेनेच्या संघटनात्मक ताकदीचे दर्शन घडवणारी ही रॅली दिसून आली.
याप्रसंगी शिवसेना नेते चंद्रकांत खैरे, शिवसेना नेते अंबादास दानवे, उपनेते सुभाष पाटील, शहरप्रमुख बाळासाहेब थोरात, हरिभाऊ हिवाळे, ज्ञानेश्वर डांगे, दिग्विजय शेरखाने, सुनिता आऊंलवार, सुनीता देव, अनिता मंत्री, दुर्गा भाटी, आशा दातार, विद्या अग्निहोत्री, सुकन्या भोसले, मीना फसाटे, ऋषिकेश खैरे, धर्मराज दानवे, हनुमान शिंदे आदींची प्रमु
ख उपस्थिती होती.
What's Your Reaction?