परभणी येथील घटनेच्या निषेधार्थ शहरात महाराष्ट्र बंदला संमिश्र प्रतिसाद, क्रांतीचौकात मोर्चा

 0
परभणी येथील घटनेच्या निषेधार्थ शहरात महाराष्ट्र बंदला संमिश्र प्रतिसाद, क्रांतीचौकात मोर्चा

परभणी येथील घटनेच्या निषेधार्थ, महाराष्ट्र बंदला संमिश्र प्रतिसाद....

छत्रपती संभाजीनगर(औरंगाबाद),दि.16(डि-24 न्यूज) 

परभणी शहरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याजवळील काचेच्या पेटीत ठेवलेल्या संविधान प्रतिमेची माथेफिरुने विटंबना केल्याची घटना गेल्या आठवड्यात घडली होती. तसेच परभणी शहरात झालेल्या दगडफेकी प्रकरणी न्यायालयीन कोठडीत असलेल्या सोमनाथ सुर्यवंशी या तरुणाचा पोलिसांच्या मारहाणीत मृत्यू झाला. या घटनेमुळे आंबेडकरी समाजात तीव्र संतापाची लाट उसळली असून या घटनेच्या निषेधार्थ सोमवार, 16 डिसेंबर रोजी रिपब्लिकन सेनेच्या वतीने महाराष्ट्र बंदची हाक देण्यात आली होती. महाराष्ट्र बंदला शहरात संमिश्र प्रतिसाद मिळाला असल्याचे चित्र दिसून आले.

परभणी येथे एका माथेफिरूने गेल्या आठवड्यात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्या समोरील संविधानाच्या प्रतिकृतीची तोडफोड करून विटंबना केली. त्यानंतर दुसऱ्या दिवशी शांततेत आंदोलन करणाऱ्या विविध आंबेडकरी विचारांच्या कार्यकर्त्यांवर पोलिसांनी लाठीमार केला होता. यावेळी झालेल्या दगडफेक प्रकरणी पोलिसांनी शेकडो तरुणांवर गुन्हे दाखल करुन 40 जणांना ताब्यात घेतले आहे. औरंगपूरा येथील महात्मा फुले, सावित्रीमाई फुले पुतळ्यासमोर मृत सोमनाथ सूर्यवंशी यांच्या प्रतिमेला अभिवादन करून विविध संघटनांनी फेरी काढून गुलमंडी, रंगारगल्ली, टिळक पथ, पैठणगेट, सिल्लेखाना, भागातील व्यापाऱ्यांना दुकाने बंद करण्याचे आवाहन केले. त्यानंतर पुढे क्रांतिचौक येथे सर्व संघटनांनी एकत्र येऊन निर्दशने करून बंदची सांगता केली.

यावेळी रिपब्लिकन सेना, सेक्युलर रिपब्लिकन फेडरेशन, भारतीय क्रांती दल, रिपब्लिकन विद्यार्थी सेना, भाकप, बहुजन समाज पक्ष, रिपाई खरात गट, समता सैनिक दल, आजाद समाज पक्ष, पँथर्स विद्यार्थी आघाडी, बी आर एस पी, शाक्य संघ, राष्ट्रीय रिपब्लिकन पक्ष, प्रहार जनशक्ती पक्ष, समता समाज संघ, भीमशक्ती रोजंदारी कर्मचारी संघटना, डॉ.आंबेडकर हातगाडी धारक संघटना, रिपाई (१९५६), रिपब्लिकन मोर्चा, बहुजन मुक्ती पार्टी, रिपब्लिकन कामगार सेना आदी संघटनांनी बंद मध्ये सहभाग नोंदविला. यावेळी सचिन निकम, प्रा.सुनील वाकेकर, चंद्रकांत रुपेकर, मिलिंद बनसोडे, प्रा.सिद्धोधन मोरे, काकासाहेब गायकवाड, प्रा.दिपक खिल्लारे, अरविंद कांबळे, शैलेंद्र मिसाळ, ॲड.अभय टाकसाळ, कुणाल राऊत, संतोष मोकळे, वसंतराज वक्ते, राहुल जाधव, श्रीरंग ससाणे, किरण पंडित, मिलिंद मोकळे, जयकिशन कांबळे, बबन साठे, अशोक गायकवाड, गणेश साळवे, राष्ट्रपाल गवई, गुणरत्न सोनवणे, ऍड.अतुल कांबळे, कुणाल भालेराव, मनीष नरवडे, आशिष भालेराव, राजू हिवराळे, अजय बनसोडे, ऍड.शिरीष कांबळे, असकर खान, असजद खान, धम्मपाल भुजबळ, गणेश रगडे, राहुल कानडे, मनीषा साळुंखे, ऍड.डी व्ही खिल्लारे, कैलास काळे, बाबा तिवारी, कपिल बनकर, बाळा बनसोड, सचिन शिंगाडे, राजा बनसोडे आदींची उपस्थिती होती.

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow