परभणीचे जिल्हाधिकारी व पोलिस अधीक्षकांना बडतर्फ करावे - साथी सुभाष लोमटे
सोमनाथ सुर्यवंशी याचे हत्तेसाठी जबाबदार परभणीचे जिल्हाधिकारी आणि पोलीस अधीक्षक यांना बडतर्फ करून संपूर्ण प्रकरणाची न्यायालयीन चौकशी करा...!!
........साथी सुभाष लोमटे
छत्रपती संभाजीनगर(औरंगाबाद), दि.16(डि-24 न्यूज)
सोमनाथ सुर्यवंशी या विद्यार्थ्याचा मृत्यू पोलिस कस्टडीत असतांना पोलिसांच्या अमानुष मारहाणी मुळे झाल्याने, या प्रकरणी जिल्ह्याचे जिल्हाधिकारी व पोलिस अधीक्षक यांना तात्काळ बडतर्फ करावे आणि या संपूर्ण प्रकरणाची न्यायालयीन चौकशी करावी अशी मागणी , जय किसान आंदोलन - स्वराज अभियानचे साथी सुभाष लोमटे यांनी केली आहे.
संविधानाचे प्रतिकृतीची मोडतोड झाल्याबरोबर , गुन्हेगारांना तात्काळ अटक झाली असती तर हे प्रकरणं एवढे चिघळलेच नसते असेही पत्रकात नमूद केले आहे.
डॉ.बाबासाहेब व संविधान हे मुद्दे संवेदनशील असल्याचे प्रशासनाला माहीत असून ही, या घटनेच्या सूत्रधारास हात लावायचा नाही, अशा तर सूचना प्रशासनाला नव्हत्या ना..?? असा प्रश्न ही पत्रकात उपस्थित केला आहे.
जात - धर्म , मंदिर - मस्जिद वा अन्य प्रार्थना स्थळ इ.बाबी वरून झालेले तंटे हे संवेदनशील पणेच हाताळायला हवे हे प्रशासन जाणते, अशी अनेक उदाहरणे देता येतील.
पण अशा घटना हाताळणाऱ्या कांहीं मंडळींचे जात - धर्माचे कंगोरे डोक्यात गेले की परभणी सारख्या घटना घडतात असेही पत्रकात अधोरेखित केले आहे.
जात - धर्मातील तंटे, प्रार्थनास्थळ वा महापुरुषांची विटंबना इ. बाबी वरून होणारे तणाव व दंगली संपवायचा असतील तर, अशा घटना घडतील त्या जिल्ह्याचे जिल्हाधिकारी व पोलिस अधीक्षकांना जबाबदार धरून त्यांना प्रथम बडतर्फ केले पाहिजे, असे वक्तव्य, केंद्रीय गृह मंत्री मा. बुटा सिंग यांनी लोकसभेत केल्याचे स्मरते असेही पत्रकात नमूद केले आहे.
कायद्याचे शिक्षण घेणाऱ्या सोमनाथ ची हत्या तर अमानुष अशीच म्हणावे लागेल. कोणाच्याही हिंसक कृत्याचे समर्थन करण्याचा प्रश्नच नाही, पण तो जर हिंसक कृत्य करतांना पकडला गेला असेल तर पोलिसांनी त्याच्यावर कठोर दंडाची कलम लावायची होती . त्याला मरेपर्यंत बेदम मारण्याचा अधिकार त्यांना कोणी दिला..??
आणि म्हणून सोमनाथ ला मारहाण करणाऱ्या पोलिस अधिकाऱ्यावर सदोष मनुष्यवधाच्या गुन्हा दाखल करावाच, जिल्हाधिकारी व पोलिस अधीक्षक यांना बडतर्फ करावे आणि परभणीच्या संपूर्ण प्रकरणाची चौकशी, उच्च न्यायालयाचे निवृत्त न्यायाधीशा मार्फत करावी अशी मागणी केली आहे.
तसेच सोमनाथ चे आई - वडीलास एक कोटीची नुकसान भरपाई तर द्यावीच पण दोघानाही आयुष्यभरासाठी पेन्शन सूरू करावी.
याच पत्रकावर माराठवडा लेबर युनियन चे सरचिटणीस अड. सुभाष सावंगीकर, साथी देविदास किर्तिशाही, साथी छगन गवळी, साथी प्रवीण सरकटे, साथी अली खान, साथी शेख खुर्रम इ. च्या सह्या आहेत.
What's Your Reaction?