पाणी टंचाई, बियाणांचा तुटवडा, शेतकरी आत्महत्येप्रकरणी अंबादास दानवेंनी सरकारला धारेवर धरले

 0
पाणी टंचाई, बियाणांचा तुटवडा, शेतकरी आत्महत्येप्रकरणी अंबादास दानवेंनी सरकारला धारेवर धरले

पाणी टंचाई, बी बियाणांचा तुटवडा, शेतकरी आत्महत्येप्रकरणी...

विरोधी पक्षनेते अंबादास दानवेंनी सरकारला धरले धारेवर

मुंबई,दि.28(डि-24 न्यूज) राज्यातील पाणी टंचाई, बी बियाणांचा तुटवडा, शेतकरी आत्महत्या, पुणे अपघातप्रकरणी सरकारी अधिकारी डॉक्टरांचा समावेश या विषयांवर विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी सरकारला धारेवर धरत या सर्व गोष्टींना सरकारला जबाबदार ठरवले आहे. 

    

   किडनी रॅकेट प्रकरणात २०२२ साली वैद्यकीय शिक्षण संचालक डॉ. दिलीप म्हैसेकर यांनी ससून प्रशासनाला पत्र पाठवून डॉ.तावरे यांना अधीक्षक पदावरून कार्यमुक्त करण्याचे आदेश दिले होते. तरीही ते अवयव प्रत्यारोपण समितीत सक्रीय होते. 

   २०२३ मध्ये वैद्यकीय शिक्षण मंत्री गिरीश महाजन आणि वैद्यकीय सचिव अश्विनी जोशी यांनी वैद्यकीय महाविद्यालयातील प्राध्यापक आणि सहाय्यक प्राध्यापक यांच्या १६ जणांच्या बदलीची फाईल काढली. ती फाईल मान्यतेसाठी मुख्यमंत्री कार्यालयाला पाठवली. मात्र यात १५ जणांच्या बदल्या झाल्या मात्र डॉ तावरे यांची बदली का झाली नाही. तावरे यांची बदली कोणी रोखली आणि त्यांना कोणाचे संरक्षण आहे, असा सवाल विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी उपस्थित केला. 

ससून रुग्णालयातील ड्रग्स माफिया ललित पाटील यांचे प्रकरण गाजले असताना पुणे अपघातातील आरोपीचे रक्ताचे नमुने बदलण्याची हिंमत येथील डॉक्टरांना कशी झाली ? पांढरा कोट घातलेले गँगस्टर आहेत का असा संतप्त सवाल दानवे यांनी विचारला.

 पुणे अपघातप्रकरणी पुणे पोलीस आयुक्तांची भूमिका देखील संशयास्पद असल्याचे दानवे यांनी म्हटले. 

संभाजी नगर येथील पिंपळखुटा गावातील विठ्ठल दाभाडे या शेतकऱ्याने सीबील स्कोअर अभावी कर्ज न मिळाल्यामुळे आत्महत्या केली. त्यामुळे बँक मॅनेजरवर कारवाई करण्याची मागणी विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी केली. तसेच मराठवाडयात गेल्या पाच महिन्यांत २६७ शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्याकडे दानवे यांनी लक्ष वेधले.

 मुख्यमंत्री टँकर लावण्यासाठी मराठवाडयात पाणी टंचाई बाबत बैठक घेण्यासाठी आले होते का असा सवाल दानवे यांनी उपस्थित करत राज्यातील पाण्याची टंचाई पाहता युती सरकारने आणलेली जलयुक्त शिवार २.० योजना फोल ठरल्याचे चित्र असल्याचे ते म्हणाले.

     गेल कंपनी परराज्यात जाण्याला सरकारच धोरण कारणीभूत आहे. सीबील शिवाय शेतकऱ्यांना कर्ज मिळेल आणि न मिळाल्यास गुन्हा दाखल करू अशी घोषणा करणाऱ्या सरकारने सीबीलअभावी कर्ज न मिळाल्याने शेतकऱ्यांनी आत्महत्या करूनही एकही गुन्हा दाखल केला नाही. राज्यात बी बियाणांचा तुटवडा भासत असून खासगी कंपन्यांच्या फायद्यासाठी हा तुटवडा निर्माण केला तर नाही ना अशी शंका दानवे यांनी व्यक्त केली.

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow