कमल तलावातील सहा मालमत्तांचे अतिक्रमण जमिनदोस्त

 0
कमल तलावातील सहा मालमत्तांचे अतिक्रमण जमिनदोस्त

कमल तलावातील सहा मालमत्तांचे अतिक्रमण जमीनदोस्त...

औरंगाबाद, दि.28(डि-24 न्यूज ) महानगरपालिकेच्या अतिक्रमण विभागाच्या वतीने कमल तलावातील सहा मालमत्तांचे अतिक्रमण आज जमीनदोस्त करण्यात आले.

आज रोजी आयुक्त तथा प्रशासक जी श्रीकांत यांच्या अध्यक्षतेखाली कमल तलाव चे कामाबाबत आढावा बैठक घेण्यात आली. सदर बैठकीमध्ये मा. आयुक्त यांनी विविध मुद्द्यावर मार्गदर्शन करून अतिक्रमण निष्काशीत करणे बाबत आदेशित केल्याने कमल तलाव नगर भूमापन क्रमांक 23 37 मधील अतिक्रमण निष्कासनाची कारवाई सुरू करण्यात आली. सदर कारवाई दुपारी तीन वाजेपासून सुरू करण्यात आली होती. यात एकूण सहा मालमत्तेवर कारवाई करण्यात आली आहे. स्थानिक नागरिकांनी व मालमत्ता धारकांनी स्वतःहून आपले अतिक्रमण निष्कासित करून घेतले. सदर ठिकाणी नगर भूमापन क्रमांक 23 37 तलावाची जमीन मध्ये नागरिकांनी आपल्या मिळकती व्यतिरिक्त तलावाच्या जमीनी मध्ये बांधकाम केले होते. सदर कार्यवाही अतिरिक्त आयुक्त संतोष वाहुळे यांच्या मार्गदर्शनाखाली उपायुक्त एक तथा अतिक्रमण विभाग प्रमुख सविता सोनवणे ,पद निर्देशित अधिकारी संजय सुरडकर, इमारत निरीक्षक मझहर अली तसेच इमारत व जलनिस्सरण विभागाचे कनिष्ठ अभियंता जावेद काझी, कर्मचारी यांनी पार पाडली.

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow