शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त छत्री वाटप...

 0
शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त छत्री वाटप...

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त छत्री वाटप...

शिवसेना नेते - विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांचे सामाजिक उपक्रम...

संभाजीनगर (औरंगाबाद), दि.27(डि-24 न्यूज) - शिवसेना पक्षप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या 65 व्या वाढदिवसानिमित्त संपूर्ण शहरात छत्री वाटप करण्यात आले. शिवसेना नेते - विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांच्या वतीने हा सामजिक उपक्रम राबविण्यात आला.

शिवसेना उपशहर प्रमुख प्रमोद ठेंगडे यांनी सूतगिरणी चौक, विभागीय क्रीडा संकुल, शिवाजीनगर आणि गादिया विहार दर्गा चौक येथे चर्मकार बांधव व इतर छोटे व्यावसायिक यांना छत्र्या वाटप केल्या. 

युवासेना सहसचिव ॲड धर्मराज दानवे यांनी क्रांती चौक, अजबनगर, कैलास नगर, गोपाल टी या परिसरात विविध नागरिकांना छत्र्यांचे वाटप केले. 

याप्रसंगी उपशहरप्रमुख प्रमोद ठेंगडे, माजी नगरसेवक विभाग प्रमुख विनोद सोनवणे, शाखाप्रमुख कल्याण चक्रनारायण, भास्कर उबाळे, देविदास पवार , सूर्यकांत कुलकर्णी, मोहन मामा म्हस्के, मनोज चव्हाण, मिलिंद जाधव , सुभाष आडे, संजय पैठणकर, रवी कोमारे, विष्णू कापसे, रामदास वाघमारे, सुखदेव जिगे,रावसाहेब राऊत , बालाजी जाधव, सत्यवान रगडे, नितीन चव्हाण, रामदास शेमाडे,कुणाल काळे, भाऊसाहेब जाधव, संजय पैठणकर इत्यादी सर्व शिवसैनिक व पदाधिकारी उपस्थित होते.

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow