उद्या मनपाचा बुलडोझर रस्त्यावर निघणार...? हर्सुलला पाडापाडीचे संकेत...

उद्या मनपाचा बुलडोझर रस्त्यावर निघणार...?हर्सुलला पाडापाडीचे संकेत...
छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद), दि.27(डि-24 न्यूज) -
काही दिवसांपासून मनपाचा बुलडोझर रस्त्यावर दिसत नव्हता उद्या रस्त्यावर येण्याचे संकेत मिळत आहे. दोन आठवड्याच्या विश्रांतीनंतर महापालिकेच्या अतिक्रमण पथक कार्यवाईसाठी सज्ज झाले आहे. बाबा पेट्रोलपंप ते दिल्लीगेट, सेवन हिल ते शहानुरमिया दर्गा चौक, देवळाई चौक ते झाल्टा फाटा, हर्सुल येथे नगरविकास विभागाच्या वतीने रस्त्यांची मार्कींग करण्यात आली आहे. चंपा चौक ते जालना रोड शंभर फुट रस्ता रुंदीकरणासाठी बाधितांची बैठक स्वतः आयुक्त जी.श्रीकांत यांनी घेत नागरीकांची समजूत काढली. उद्या 28 जुलै रोजी सकाळी हर्सुल येथील रुंदीकरणाची कार्यवाई सुरु करणार असल्याची माहीती सुत्रांनी दिली आहे. महापालिकेच्या अतिक्रमण हटाव विभागाने संपूर्ण तयारी केली असून 15 जेसीबी, 15 टिप्पर, 4 पोकलेन, अग्निशमन, कोंडवाडा आणि विद्युत विभागाचे हायड्रोलिक वाहने असतील अशी माहिती आहे.
अगोदर महापालिकेने बाबा पेट्रोल पंप ते केंब्रीज चौक, बीड बायपास, महानुभाव चौक ते नक्षत्रवाडी पैठण रोड, रेल्वेस्टेशन ते बाबा पेट्रोल पंप, पडेगाव, दिल्लीगेट ते हर्सुलवासीयांनी टि पाॅईंट, हर्सुल टि पाॅईंट ते जळगांव रोड, सिडको बसस्टँड येथील अतिक्रमणे मनपाने काढली.
काही दिवसांपूर्वी मनपाने हर्सुल येथे रस्ता रुंदीकरणासाठी भोंगा फिरवला होता. तेथील नागरीकांनी मनपा आयुक्त तथा प्रशासक जी. श्रीकांत यांची भेट घेवून अतिक्रमण काढण्यासाठी वेळ द्यावा. मार्कींग करुन मोबदला देण्याची मागणी केली होती. त्यानंतर नगररचना विभागाने मालमत्तांवर मार्कींग केली. G-20 परिषदेपुर्वी अजिंठा रस्त्यासाठी हर्सुल गावात शंभर फुट रस्ता रुंद करण्यासाठी पाडापाडी केली होती. हा रस्ता दोनशे फुट असल्याने उर्वरीत शंभर फुट रस्ता रुंद करण्यासाठी महापालिका कार्यवाई करणार आहे. या कार्यवाईत 150 मालमत्ता बाधित होणार आहे. पुन्हा कार्यवाई होवू नये म्हणून येथील 15 बाधित मालमत्ताधारक न्यायालयात गेले होते. 28 जुलैपर्यंत दिलासा मिळाला होता परंतु याच दिवशी कार्यवाई मनपाच्या वतीने होणार असल्याने मालमत्ताधारक हवालदिल झाले आहे. काही मालमत्ताधारकांनी स्वतः अतिक्रमण काढण्यास सुरुवात केली आहे. आता बघावे लागेल उद्या अतिक्रमण हटावची कार्यवाई होणार का...
What's Your Reaction?






