आरएसएसच्या कार्यालयावर मोर्चा काढण्यास परवानगी नाकारली, आंबेडकर मोर्चा काढण्यावर ठाम

 0
आरएसएसच्या कार्यालयावर मोर्चा काढण्यास परवानगी नाकारली, आंबेडकर मोर्चा काढण्यावर ठाम

आरएसएसच्या कार्यालयावर मोर्चा काढण्यास परवानगी नाकारली तरीही आंबेडकर मोर्चा काढण्यावर ठाम...

छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद), दि.22(डि-24 न्यूज)- 24 ऑक्टोबर-2024 रोजी वंचित बहुजन आघाडीच्या वतीने आरएसएसच्या बाबा पेट्रोल पंप येथे आक्रोश मोर्चा काढण्यात येणार आहे. घाटकोपर येथे आरएसएसच्या पथसंचलनाला आंबेडकरी जनतेने विरोध केल्याने कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाल्याने मुंबई पोलीस अलर्ट मोडवर आहे. कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये म्हणून छत्रपती संभाजीनगर पोलिस अलर्ट झाली आहे म्हणून वंचितच्या पदाधिकाऱ्यांना नोटीस बजावली आहे. हा मोर्चा काढण्यात येऊ नये असा उल्लेख नोटीस मध्ये करत परवानगी नाकारली आहे. काही दिवसांपूर्वी शासकीय अभियांत्रिकी व पाॅलिटेक्निक महाविद्यालयासमोर संघाची सदस्य नोंदणी सुरू असताना वंचितच्या पदाधिकाऱ्याने नोंदणी थांबवली यानंतर आठ जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला होता. हा गुन्हा पोलिसांनी रद्द करावा या मागणीसाठी हा मोर्चा काढण्यात येणार होता. संघाच्या दबावाखाली हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे असा आरोप आंबेडकरी समाजाचा आहे.

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या कार्यालयावर मोर्चा काढण्याची घोषणेनंतर पोलिसांनी वंचितचे सर्वेसर्वा एड बाळासाहेब आंबेडकर यांच्याशी संपर्क करुन मोर्चाचे स्थळ बदलून जिल्हाधिकारी कार्यालय असे करण्याची विनंती केली परंतु त्यांनी दोन पर्याय ठेवले नसता मोर्चा निघणार असल्याचे पोलिसांना सांगितले.

पक्षाचे प्रवक्ते सिध्दार्थ मोकळे यांनी आपल्या सोशलमिडीया पोस्टमध्ये मोर्चा निघणार असल्याचे सांगितले.

आरएसएसची अनधिकृत संघटना असेल तर तिच्यावर गुन्हा दाखल करा त्यानंतर आम्ही मोर्चा रद्द करु.

आरएसएसची नोंदणी प्रमाणपत्र दाखवावे, पोलिसांनी संघावर एफआयआर दाखल करावा नाही तर 24 तारखेला मोर्चा निघणार असल्याची ठाम भुमिका आंबेडकरांनी घेतली आहे. अशी माहिती सिध्दार्थ मोकळे यांनी दिली.

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे काही पदाधिकारी शहरातील काही महाविद्यालयाच्या परिसरात बेकायदेशीरपणे सदस्य नोंदणी करत होते. वंचित पश्चिमचे युवा आघाडीचे अध्यक्ष राहुल मकासरे, विजय वाहुळ यांनी विरोध दर्शवला होता. त्यांनी याप्रकरणी पोलिसांशी संपर्क साधला. पण त्यांच्यावर गुन्हे दाखल केले. याप्रकरणी विनंती करुनही त्यांच्या विरोधातील गुन्हे मागे घेण्यात आले नाही. त्यामुळे वंचितने 24 ऑक्टोबर रोजी शुक्रवारी, सकाळी 11 वाजता क्रांतीचौक येथून बाबा पेट्रोल पंप येथील राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या कार्यालयावर जन आक्रोश मोर्चा आंबेडकरी समाज व पक्ष संघटनांच्या उपस्थितीत काढणार असल्याचे जाहीर केले.

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow