27 वर्षानंतर महाविद्यालयाचे विद्यार्थी आले एकत्र

 0
27 वर्षानंतर महाविद्यालयाचे विद्यार्थी आले एकत्र

27 वर्षांनंतर मौलाना आझादचे माजी विद्यार्थी ‘बॉयज अलुम्नाय’ एकत्र औरंगाबाद,दि.2 (डि-24 न्यूज):- येथील मौलाना आझाद महाविद्यालाचे माजी विद्यार्थी ‘बॉयज अलुम्नाय’ तब्बल 27 वर्षानंतर एकत्र आले. काही विध्यार्थी चांगल्या पदावरून निवृत्त झालेत तर काही निवृत्तीच्या उंबरठ्यावर असतांना सध्याचे वय विसरून सर्वांनी धमाल मौज केली.

      साबेरी सय्यद इबतेसाम यांनी या मेळाव्यासाठी फार्म हाउस आणि जेवण प्रायोजित केले. दिवसभर चाललेल्या या मेळाव्यात संगीत कुर्ची, क्रिकेट स्पर्धा, बास्केट बॉल स्पर्धासहित विभिन्न सामने आयोजित करण्यात आले. माजी विद्यार्थ्यांच्या महाविद्यालयात शिकत असताना सादर केलेले विविध सांस्कृतिक कार्यक्रम, अंतर विद्यापीठीय, राज्य स्तरीय तसेच राष्ट्रीय स्पर्धांचे छायाचित्र प्रदर्शन ही भरविण्यात आले.

      सय्यद नसीरुद्दीन काद्री, इब्तेसाम साबेरी, मसूद टोपीवाला, अन्वर चिस्ती, जकी सिद्दिकी, अब्दुल रेहमान, अकील खान समूह, आरिफ शेजूर, शाहेद शेख आदींनी यासाठी पुढाकार घेतला. अमजद आली यांनी विविध गाणे गाईले. परदेशात राहणारे काही सदस्य हे झूम आणि दूरदृश्यसंवाद प्रणाली मार्फत सामील झाले.या वेळी प्रामुख्याने रियाझ कुरेशी, एहतेशाम काद्री, काझी नाझीमुद्दिन,अह्मेद जलील, कमाल फारुकी, उमर फारुकी, नादेर मांडणी, हमद बसाद,शेख असिफ, हसवी मकीन, शारेक आरीफी, अझहर सिद्दिकी, शकील अह्मेद, अब्दुर रहीम, सानौलः खान, अब्दुर रझाक, असद खान, शेर खान, हबीब पाशशा, अब्दुल वाजीद, जावेद इद्रीस, अब्दुल्ला हिलाबी, झाकीर आदींची उपस्थिती होती. एकूण 127 विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदविला.

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow