रविवारी महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची दुय्यम सेवा परीक्षा, 1128 उमेदवार देणार परीक्षा

महाराष्ट्र लोकसेवा आयोग दुय्यम सेवा परीक्षा रविवारी
चार केंद्रांवर 1128 उमेदवार देतील परीक्षा; 137 कर्मचारी नियुक्त
औरंगाबाद, दि.25(डि-24 न्यूज) महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत रविवार दि.29 ऑक्टोबर रोजी दुम्मयसेवा अराजपत्रिक गट-ब, मुख्य परीक्षा 2022 पेपर क्रमांक 2 पोलीस उपनिरीक्षक य परीक्षेचे आयोजन करण्यात आले आहे. ही परीक्षा जिल्ह्यातील चार परीक्षा केंद्रांवर होणार असून 1128 उमेदवारांच्या परीक्षा देण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. परीक्षा सुरळीत पार पाडण्यासाठी जिल्हा प्रशासन सज्ज असून 137 अधिकारी- कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे, अशी माहिती उपजिल्हाधिकारी प्रभोदय मुळे यांनी दिली आहे.
या परीक्षेसाठी शहरातील येथील श्रीमती वेणूताई चव्हाण कन्या प्रशाळा, एन-8, सिडको येथे 288 परीक्षार्थी, एम.जी.एम. जवाहरलाल नेहरु इंजिनिअरींग महाविद्यालय, एन 6, सिडको येथे 288, एम.जी.एम. पॉलिटेक्निक एन -6, सिडको, सेंट्रल नाका येथे 288 , गव्हर्नमेंट कॉलेज ऑफ आर्टस ॲण्ड सायन्स, सुभेदारी विश्रामगृहाजवळ, विश्वास नगर येथे 264 अशा एकूण 1128 परीक्षार्थींच्या परीक्षेची व्यवस्था करण्यात आली आहे. या परीक्षेसाठी 137 अधिकारी कर्मचारी नियुक्त करण्यात आले आहेत.
परीक्षार्थींसाठी सुचनाः-
परीक्षार्थींनी परीक्षेस येतांना ओळखीचा पुरावा (स्वतःचे आधार कार्ड, निवडणूक आयोगाचे ओळखपत्र, पासपोर्ट, पॅन कार्ड, स्मार्टकार्ड प्रकारचे ड्रायव्हींग लायसन्स या पैकी कोणतेही एक) परीक्षा कक्षात उमेदवारास प्रवेश प्रमाणपत्र, काळ्या शाईचे बॉलपेन, ओळखपत्र, ओळखपत्राची छायांकीत प्रत या व्यतिरिक्त अन्य कोणतेही साहित्य अथवा वस्तू परीक्षा कक्षात घेऊन जाण्यास परवानगी नाही. तसेच डिजीटल डायरी, मायक्रोफोन, मोबाईल, ब्लू टूथ, कॅमेरा फोन अन्य तत्सम संदेशवाहक उपकरण, इलेक्र्ट्रॉनिक साहित्य परीक्षा कक्षात नेण्यास मनाई आहे.
What's Your Reaction?






