D24NEWS BREAKING NEWS, मराठा आंदोलक जिल्हाधिकारी कार्यालयाच्या इमारतीवर आंदोलन केल्याने खळबळ

 0
D24NEWS BREAKING NEWS, मराठा आंदोलक  जिल्हाधिकारी कार्यालयाच्या इमारतीवर आंदोलन केल्याने खळबळ

D24NEWS BREAKING NEWS, मराठा आंदोलक चढले जिल्हाधिकारी कार्यालयाच्या इमारतीवर

राज्यात खळबळ,

औरंगाबाद, दि.26(डि-24 न्यूज) आज सकाळी अकरा वाजता जिल्हाधिकारी कार्यालयाच्या इमारतीवर पाच तरुणांनी आंदोलन सुरू केल्याने खळबळ उडाली. पाच मराठा आंदोलक आरक्षणाच्या मागणीसाठी व सरसकट कुणबीचे प्रमाणपत्र देण्यात यावे व कर्ज प्रकरणे मंजूर करावी या मागणीसाठी इमारतीवर चढून आंदोलन करत असल्याने प्रशासनाची धावपळ उडाली.

पोलिस सुध्दा त्यांची समजूत काढण्यासाठी इमारतीवर चढले होते. काही तास आंदोलन केल्यानंतर खाली उतरले. अप्रिय घटना होऊ नये यासाठी पोलिसांना पाचारण करण्यात आले होते. पाच तरुण इमारतीवर चढून घोषणाबाजी देत होते यावेळी मोठा जमाव येथे जमला होता. पोलिसांनी समजूत काढत इमारतीच्या खाली उतरवले. जिल्हाधिकारी यांच्या दालनासमोर घोषणाबाजी त्यांनी केली. जरांगे पाटील तुम आगे बढो हम तुम्हारे साथ है, आरक्षण आमच्या हक्काचे नाही कुणाच्या बापाचे अशी घोषणा दिल्या. सरकारने तात्काळ मराठा समाजाला आरक्षण देण्याचा निर्णय घेतला नाही तर हे आंदोलन पुन्हा उग्र रूप धारण करणार आहे. आतापर्यंत चार जणांनी बलिदान दिले आणखी किती लोकांचा जीव गमवायची वाट पाहत आहे सरकार. अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाच्या वतीने कर्ज मिळत नाही बँकेचे चकरा माराव्या लागतात. कर्ज देण्यास बँक टाळाटाळ करीत आहे दोन दिवसांत जिल्हाधिकारी यांनी सर्व बँकेच्या शाखा व्यवस्थापक यांची बैठक घेऊन कर्ज प्रकरणे मंजूर करावी असे निवेदनात म्हटले आहे.

आंदोलक मराठा मावळा संघटनेच्या ग्रामीण जिल्हाध्यक्ष उदयराज गायकवाड, जिल्हाध्यक्ष भारत कदम पाटील, मराठवाडा अध्यक्ष पंढरीनाथ गोडसे पाटील व दोन युवक उपस्थित होते.

महसूल अधिकारी यांनी युवकांशी चर्चा केली व समजूत काढली. मागणी शासनाकडे पाठविण्यात येणार आहे अशी माहिती यावेळी डि-24 न्यूजला मिळाली.

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow