देशातील 5 लाख 48 हजार रेशन दुकानदार संपावर, किंग मेकरची भुमिका तरी मिळेना न्याय
देशातील 5 लाख 48 हजार रेशन दुकानदार संपावर, किंग मेकरची भुमिका तरी मिळेना न्याय
15 जानेवारी पर्यंत मागण्या मान्य झाल्या नाही तर जंतरमंतर मोर्चा काढण्याचा राज्याध्यक्ष डी.एन.पाटील यांचा इशारा....रेशन दुकानदारांची आर्थिक कोंडी, तीन दुकानदारांचा उपचाराविना मृत्यू .... राज्यातील 53 हजार, जिल्ह्यातील 1800, शहरातील 199 रेशन दुकानदार संपात सहभागी...
औरंगाबाद, दि.5(डि-24 न्यूज) विविध मागणीसाठी देशातील रेशन दुकानदारांची संघटना ऑल इंडिया फेअर प्राईज शाॅप डीलर्स फेडरेशन, नवी दिल्ली या देशपातळीवरील संघटनेमार्फत 1 जानेवारी 2024 पासून देशात करण्यात येणारे "रेशन बंद" आंदोलन व अखिल महाराष्ट्र स्वस्त धान्य दुकानदार केरोसीन परवानाधारक महासंघाच्या वतीने हा संप पुकारण्यात आल्याने कार्डधारकांना अन्नधान्य वितरण कसे होईल असा प्रश्न उपस्थित होत आहे. 15 जानेवारी पर्यंत मागण्या मान्य झाल्या नाही तर दिल्लीत जंतरमंतरवर भव्य मोर्चा काढण्यात येईल असा इशारा पत्रकार परिषदेत राज्याध्यक्ष डी.एन.पाटील यांनी दिला आहे. संपावर कधी तोडगा निघेल हे आता बघावे लागेल.
पत्रकार परिषदेत मधुकर चव्हाण, ललित पाटणी, सुखदेव कदम, गंगाधर पवार, अनिल जाधव, तात्याराव मगरे, सुभाष चौधरी, यशवंत काळे, शेख रफीक व संघटनेचे पदाधिकारी उपस्थित होते.
डी.एन.पाटील यांनी केंद्र सरकारवर आरोप केला की आमच्या रास्त मागणीवर चर्चा न करता राज्य सरकारवर ढकलले जात आहे. सध्या जी महागाई झालेली आहे रेशन दुकान चालवणे या खर्चामुळे कठीण जात असल्याने फक्त प्रती क्विंटल दिडशे रुपये कमिशन दिले जात आहे महागाई वाढली म्हणून हे कमिशन तीनशे रुपये प्रति क्विंटल करावे अशी मागणी आहे. संघटनेचे पाच लाखांहून जास्त सदस्य आहेत आपल्या मागण्या मान्य करण्यासाठी राजकीय भुमिका का घेत नाही याबद्दल उत्तर देताना त्यांनी सांगितले संघटना राजकीय नाही आम्ही आपल्या हक्काच्या मागणीसाठी लोकशाही मार्गाने आंदोलन करुन आपली भुमिका मांडत असतो. आम्ही किंग बणू शकत नाही पण किंग मेकर आहोत. मागणी मान्य झाली नाही तर पुढील काळात निवडणूक आहे. असा इशारा त्यांनी सत्ताधारी पक्षाला दिला आहे. संप शंभर टक्के यशस्वी होत आहे. अन्नधान्य वितरणावर या संपाचा परिणाम होत असल्याने त्यांनी कार्डधारकांशी दिलगिरी व्यक्त करत म्हटले आहे या परिस्थितीला शासन जवाबदार आहे. कारण शहरातील तीन रेशन दुकानदारांकडे उपचारासाठी पैसे नसतात त्यांचा जीव गेला आहे.
ज्या रेशन दुकानावर 300 कार्ड आहे त्यांना 90 क्विंटल धान्य मिळते. प्रती क्विंटल 150 रुपये प्रमाणे 13,500 उत्पन्न मिळते. खर्च याहुन जास्त होत आहे. जागेचे भाडे 2500, लाईटबील 800 रुपये, अकुशल कामगार 6 हजार मजूरी, घट 1800, इलेक्ट्रॉनिक वजन काटा खर्च 200, ई-पाॅस मशिन रिचार्ज 700, स्टेशनरी 250, पेट्रोल 2000, 300 कार्डाचे दुकान चालवण्यासाठी एकूण खर्च 14,250, महागाईनुसार एकूण खर्च 14,250, एकूण मिळणारे उत्पन्न 13500, 750 रुपये निव्वळ तोटा.
600 कार्ड असलेल्या दुकानास येणारा मासिक खर्च...
180 क्विंटल अन्नधान्य मिळते. प्रती क्विंटल 150 रुपये कमिशन 27000 मिळते.
जागेचे भाडे 6500, लाईट बील 2000, अकुशल कामगार 11000, घट 3600, इलेक्ट्रॉनिक वजन काटा खर्च 200, ई-पाॅस मशिन रिचार्ज 700, स्टेशनरी 600, पेट्रोल 2000, दुकान खर्च 26,600, महागाईनुसार एकूण खर्च 26,600, एकूण मिळणारे उत्पन्न रक्कम 27,000, निव्वळ नफा 600 रुपये. असा तक्ता त्यांनी प्रसिध्दी माध्यमांना दिला.
What's Your Reaction?