आज रात्री 12 वाजेपासून शहरातील ऑटोचा चक्काजाम, महाराष्ट्रात पण होणार चक्काजाम

 0
आज रात्री 12 वाजेपासून शहरातील ऑटोचा चक्काजाम, महाराष्ट्रात पण होणार चक्काजाम

आज रात्री 12 वाजेपासून शहरातील ऑटोचा चक्का जाम...हा चक्काजाम महाराष्ट्रात 

औरंगाबाद, दि.2(डि-24 न्यूज) वाहनचालकांने अपघात केल्यास 10 वर्षे तुरुंगवासाची शिक्षा व 7 लाख रुपये दंड हा कायदा केंद्र शासनाने बनवल्याने या कायद्याचा मोठ्या प्रमाणात विरोध केला जात आहे. हा कायदा मागे घ्यावा व वाहनचालकांच्या सुरक्षेबाबत कायदा बनवावा व या कायद्याच्या निषेधार्थ देशभरात आंदोलन, चक्का जाम केले जात आहे. 1 जानेवारी पासून पेट्रोल पंपावर वाहतूक करणाऱ्या चालकांनी चक्का जाम 3 जानेवारीपर्यंत करण्याचा निर्णय घेतल्याने अनेक पेट्रोल पंप ड्राय झाल्याने इंधन मिळत नसल्याने वाहनधारकांना त्रास होत असल्याने महत्वाची कामे थांबली आहे. राज्य सरकारने उद्यापासून पोलिस बंदोबस्तात टँकरने इंधन पुरवठा करण्याचा निर्णय घेतला आहे यामुळे वाहनधारकांना दिलासा मिळणार आहे.

तर या कायद्याचा निषेध करण्यासाठी शहरातील 32 हजार ऑटोरिक्षा आज 2 जानेवारी तर 3 जानेवारी रात्री 10 वाजेपर्यंत चक्का जाम आंदोलन करणार असल्याची माहिती डि-24 न्यूजला रिक्षाचालक मालक संघर्ष कृती समितीचे अध्यक्ष निसार अहमद खान यांनी दिली आहे. या चक्का जाम आंदोलनात अनेक संघटनांचा सहभाग असणार आहे. उद्या जिल्हाधिकारी यांना आपल्या मागणीचे निवेदन देण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले. या आंदोलनात स्कुल बस व ऑटोरिक्षा सहभागी होणार असल्याचे त्यांनी सांगितले.

ऑटोरिक्षा चक्का जाम आंदोलनात लाल बावटा ऑटो युनियन, भीमशक्ती रिक्षा चालक मालक संघटना, शिव वाहतूक सेना, भारतीय जनता पार्टी रिक्षा संघटना, महाराष्ट्र रिक्षाचालक सेना, काँग्रेस प्रणित ऑटो युनियन, राजीव गांधी ऑटो युनियन, रोशन ऑटो रिक्षा युनियन, जनता ऑटोरिक्षा युनियन चक्का जाम आंदोलनात सहभागी होणार असल्याची माहिती मिळाली आहे. एकीकडे पेट्रोल पंपावर इंधन नाही, काही दुचाकी इंधन मिळत नसल्याने घरी उभ्या कराव्या लागल्या आहेत. तर महत्वाचे कामाने उद्या बाहेर जायचे असल्यास ऑटो पण मिळणार नाही म्हणून सामान्य नागरिकांना सिटीबस शिवाय वाहतूक करण्यास पर्याय नाही.

वाहन चालक मालक संघटनेच्या वतीने उद्या सकाळी 11 वाजता चक्का जाम आंदोलन हर्सुल टि पाॅईंटवर करण्यात येणार असल्याची माहिती सुत्रांकडून मिळाली आहे.

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow