शाहीन पठाण यांची समाजवादी पार्टीच्या महीला जिल्हाध्यक्ष पदी नियुक्ती...
                                शाहीन पठाण यांची समाजवादी महीला जिल्हाध्यक्ष पदी नियुक्ती
छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद), दि.3(डि-24 न्यूज)- समाजवादी पार्टीच्या महीला जिल्हाध्यक्ष पदी शाहीन पठाण तर प्रदेश सचिवपदी संजीव कुमार एकखारे, जिल्हा उपाध्यक्ष पदी श्रीमती फहेमीदा खान, फुलंब्री तालूका अध्यक्ष मोबीन पटेल यांची नियुक्ती प्रदेशाध्यक्ष तथा आमदार अबु असिम आझमी यांनी केली आहे. अशी माहिती पत्रकार परिषदेत प्रदेश महासचिव अब्दुल रऊफ यांनी दिली आहे.
त्यांनी पुढे सांगितले पक्षाची महीला कार्यकारिणी लवकरच घोषणा करुन आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांमध्ये याचा फायदा होईल. जिल्हा परिषद, पंचायत समिती, नगरपालिका व नंतर महापालिका निवडणुकीत उमेदवार सक्षम उमेदवार देण्यासाठी अबु असिम आझमी निर्णय घेणार आहे. शहरात अनेक नागरी समस्या आहेत ते सोडवण्यासाठी समाजवादी पार्टी रस्त्यावर उतरुन आंदोलन करणार आहे. लोकांमध्ये जाऊन त्यांचे प्रश्न सोडवण्यात येतील असे आश्वासन त्यांनी देत पक्ष संघटना अधिक मजबूत करण्यासाठी जनतेने पक्षासोबत यावे असे आवाहन केले. यावेळी एम आय एम चे प्रदेशाध्यक्ष सय्यद इम्तियाज जलिल यांनी अबु असिम आझमी यांच्यावर टीका केल्याने त्यांचे प्रतिउत्तर त्यांनी दिले.
याप्रसंगी महानगर अध्यक्ष अयूब पटेल, जिल्हा व महानगर महासचिव एड गुफरान पटेल व पदाधिकारी उपस्थित हो
ते.
What's Your Reaction?