तृतीय पंथियांच्या टोळींचा वाद पेटला, वाद पोहोचला पोलिस आयुक्तांकडे
तृतीय पंथियांमध्ये गट, आरोप प्रत्यारोप, वाद पोहोचला पोलिस आयुक्तांकडे
छत्रपती संभाजीनगर(औरंगाबाद), दि.3(डि-24 न्यूज) शहरातील मुख्य वाहतूक सिग्नलवर तृतीय पंथियांच्या झुंडीच्या झुंडी दिसत आहे. वाहतूक सिग्नलवर यामुळे वाहनधारकांना नाहक त्रास सहन करावा लागतो. या तक्रारी पोलिसांकडे येत असल्याने काही तृतीय पंथियांवर गुन्हे सुध्दा दाखल झाले. तृतीय पंथियांमध्ये पण आता गट पडले आहे. यामधून एका गटाने आज पोलिस आयुक्त कार्यालयात निवेदन देत दुसऱ्या गटावर कारवाईची मागणी केली आहे. ज्या तृतीयपंथींवर आरोप केले त्यांनी हे आरोप फेटाळून निराधार असल्याचे सांगितले. खोटे तक्रारी केली जात आहे व मला जीवे मारण्याचे धमक्या दिल्या जात असल्याचा आरोप सुहाना शेख उर्फ गुड्डी, राहणार नारळीबाग, गणपती मंदिर शेजारी, छत्रपती संभाजीनगर(औरंगाबाद) याने लावला आहे.
विविध जिल्ह्यांतून आलेल्या तृतीयपंथींनी पोलिस आयुक्तांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे सुहाना शेख उर्फ गुड्डी हि व्यक्ती गुन्हेगारी प्रवृत्तीची असून 3/7/2023 रोजी दोन वर्षांसाठी तडीपारीची कार्यवाही झालेली आहे. हि व्यक्ती अनेक गुन्ह्यांमध्ये आरोपी असून तिच्यावर कारवाईची मागणी केली आहे.
हि व्यक्ती शहरात तृतीयपंथी सदृश्य लोक गोळा करुन टोळी बनवत आहेत. या टोळीच्या सहाय्याने रस्त्यावर, सिग्नलवर सामान्य मानसांची पिळवणूक सुरू केली आहे. व्यसनाधीन अवस्थेत अश्लील हावभाव करतात. ज्याचा समाजातील महिला, लहान मुले यांच्यावर विपरीत परिणाम होऊन ख-या तृतीयपंथींची प्रतिमा मलिन होत आहे. त्यामुळे शहरातील सामान्य तृतीयपंथी समुदायाला संघर्षाला सामोरे जावे लागत आहे. ह्या सुहाना उर्फ गुड्डी शेख वर फोडण्यासारखे गंभीर गुन्हे आहेत हिला वचक राहिला नाही. नाशिक , अहिल्यानगर(अहमदनगर), धुळे, छत्रपती संभाजीनगर(औरंगाबाद) येथील समुदायातील जेष्ठ नागरिक व आमचे शिष्य आपणास विनंती करतो की हि व्यक्ती आणि टोळिकडून शहरातील समुदायास जिवीत हानीचा धोका असल्याने भितीत जगत आहेत. हि व्यक्ती रात्री अपरात्री येऊन त्यांना त्यांच्या समाजघातक कृत्यात सहभागी होण्यास दबाव आणत आहे. तक्रार देणा-यास जिवे मारण्याची धमकी देते. ज्यामुळे ते भयभीत झाले आहे. इथल्या तृतीयपंथींची काळजी वाटत आहे. त्यासोबतच ह्या गुन्हेगारी मानसिकतेची टोळी शहरात सक्रीय झाली आहे. यामुळे समाजात वावरणे कठीण झाले आहे.
निवेदनात अहिल्यानगर(अहमदनगर) जिल्हाध्यक्ष काजल गुरु, तृतीयपंथी हक्काचे संरक्षण आणि कल्याणकारी मंडळ, सदस्य, मानवता किन्नर संस्था, नाशिक, सलमा गुरु, पद्मा गुरु, जिल्हाध्यक्ष धुळे, कमलाबाई राजपूत, कोयल गुरु नायक, गंगापूर व इतर शेकडो तृतीयपंथी उपस्थित होते.
या आरोपांचे खंडन करत सुहाना शेख उर्फ गुड्डी हिने सांगितले हे सर्व आरोप निराधार आहे. तडीपारीचे आदेश स्थगित झाले आहे. माझ्याकडे दिडशे तृतीयपंथी आहे ते कोणालाही त्रास देत नाही. सिग्नलवर नाही तर ते मुख्य बाजारात भिक मागून आयुष्य जगतात. माझ्यावर खोटे गुन्हे दाखल केले जात आहे. माझ्यापासून कोणालाही त्रास नाही. भक्तीभावाने मी नारळीबाग येथे वास्तव्यास आहेत. निवासस्थानी सिसिटिवी कॅमेरे बसवले आहे. शेजारच्या लोकांना विचारा कोणालाही त्रास नाही मला नाहक बदनाम केले जात आहे. अशी प्रतिक्रिया तिने दिली आहे.
What's Your Reaction?