पीएफ आयच्या आडून मुस्लिम धार्मिक संघटना रडारवर-जियाऊद्दीन सिद्दीकी

 0
पीएफ आयच्या आडून मुस्लिम धार्मिक संघटना रडारवर-जियाऊद्दीन सिद्दीकी

पीएफआयच्या आडून मुस्लिम धार्मिक संघटना रडारवर- जियाऊद्दीन सिद्दीकी 

औरंगाबाद, दि.13(डि-24 न्यूज) बंदी असलेली पीएफ आय संघटनेवर देशभरात सध्या एन.आय.ए च्या सध्या धाडी सुरू आहे. या सरकारी संस्थेने 20 ठिकाणी धाडी टाकल्या आहेत परंतु याआडून मुस्लिम धार्मिक संघटनांना नाहक त्रास दिला जात आहे. पीएफआयच्या नावाखाली वहदत-ए-इस्लामी या संघटनेच्या नियतकालिक मासिक "वहदते जदीद" च्या दिल्ली येथील कार्यालयात धाड टाकण्यात आली आहे. महाराष्ट्र, उत्तर प्रदेश, तामिळनाडू, राजस्थान मध्ये वहदते इस्लामी हिंदच्या काही कार्यकर्त्यांच्या घरांची तपासणी करण्यात आली त्यांना दिवसभर मानसिकदृष्ट्या त्रस्त करण्यात आले असा आरोप या संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष जियाऊद्दीन सिद्दीकी यांनी पत्रकार परिषदेत केला आहे.

वहदते इस्लामी हिंद हि एक इस्लामी वैचारिक संघटना आहे. हि संघटना इस्लामी तत्वावर आधारित मानवतेसाठी कार्य करत आहे. या उद्दिष्टांसाठी हि संस्था नियमानुसार व पारदर्शक विविध उपक्रम देशाच्या 16 राज्यात राबवित आहे.

आपल्या कार्यकर्त्यांना नेहमी न्याय व शांती तसेच निती मुल्यांवर आधारित आचरणांची शिकवण देत असते. म्हणून वहदते इस्लामीच्या कार्यकर्त्यांवर करण्यात आलेल्या सर्व आरोपांचे सिद्दीकी यांनी खंडन केले.

ज्या एफआयआरच्या आधारावर संपूर्ण भारतात आमच्या संस्थेवर निशाणा साधण्यात येत आहे त्याचेशी वहदते इस्लामी हिंदचा काहीही संबंध नाही. सरकारला जर असे वाटत असेल तर तो गैरसमज आहे. आम्ही आमची बाजू नेहमी स्वच्छ व स्पष्ट शब्दात मांडत असतो. सकारात्मक विचार करत असतो. आमच्या संघटनेला बेकायदेशीर ठरविण्यासाठी वातावरण निर्मिती करुन पार्श्वभूमी तयार करण्याचा प्रयत्न सुरू आहे असा आरोप त्यांनी पत्रकार परिषदेत लावला.

पीएफआय व वहदते इस्लामी हिंद या वेगवेगळ्या संस्था संघटना आहे. दोन्हींचे कार्य वेगळे आहे. पीएफआयच्या नावाखाली आमच्या कार्यकर्त्यांच्या घरांची झडती का घेतली जात आहे असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला. या झडतीत काय सापडले तर वहदते जदीद या नियतकालिकाचे अंक, इस्लामी साहित्य, धार्मिक व आध्यात्मिक ग्रंथ, काही दैनिक वृत्तपत्रे व कात्रणे तसेच काही आवश्यक कागदपत्रे. हे सर्व आपत्तीजनक आहे का...? ज्यांच्या आधारावर त्रास देण्याचा प्रयत्न होत आहे उलट प्रत्येकवेळी आमच्या कार्यकर्त्यांनी तपासयंत्रणेच्या तपासकार्यात सहकार्य केले.

आम्ही आजच्या परिस्थितीत दैनंदिन जीवनात मान सन्मान, संपत्ती व प्राणांवर विविध मार्गांनी होत असलेल्या हल्ल्यांमुळे संघर्ष शील आहे. त्याबरोबर तपास यंत्रणांच्या या कार्यवायांमुळे त्रासात भर पडत आहे. तपासयंत्रणेच्या तपासकार्यात सहकार्य करणार पण अपमान व नाहक बदनामी सहन केली जाणार नाही. या घटनेचा आम्ही तीव्र शब्दांत निषेध करत आहे असे सिद्दीकी म्हणाले. पत्रकार परिषदेत शेख मुन्तजीब, मसूद महेबुब खान व पदाधिकारी उपस्थित होते.

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow