अखेर गंगापूरमधून सतीश चव्हाण यांना शरद पवारांनी दिली उमेदवारी

अखेर गंगापूरमधून सतीश चव्हाण यांना शरद पवारांनी दिली उमेदवारी
राष्ट्रवादी भवन येथे झालेल्या पत्रकार परिषदेत जिल्हाध्यक्ष व पदाधिकारी उपस्थित नव्हते अशी चर्चा आहे की त्यांना उमेदवारी दिल्याने पक्षाचे कार्यकर्ते नाराज झाले आहेत....!
छत्रपती संभाजीनगर(औरंगाबाद), दि.26(डि-24 न्यूज) गंगापूर-खुलताबाद विधानसभा मतदारसंघातून अखेर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या वतीने आमदार सतीश चव्हाण यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी उमेदवारी जाहीर केली आहे. पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी या मतदारसंघातून तयारी करण्यास सांगितले होते. महायुतीत हि जागा भाजपाला सुटली असल्याने महाविकास आघाडीच्या वतीने मतदार संघाचा विकास करण्यासाठी निवडणुकीच्या रिंगणात उतरलो आहेत. अशी माहिती पत्रकार परिषदेत त्यांनी देत शरद पवार यांचे आभार मानले.
व्यापारीवर्ग भाजपाचे उमेदवार प्रशांत बंब यांच्या सोबत आहे असा प्रश्न विचारला असता त्यांनी सांगितले मी ग्राहकांच्या हितासाठी निवडणूक लढत आहे. या मतदारसंघात दोन वर्षांपासून विकासकामे करत आहे त्यासाठी अजित पवार यांनी निधी दिला होता. सर्व जाती धर्मातील लोक माझ्या सोबत आहे. बंब यांनी काय विकास केला प्रचारात सांगणार आहे. सामान्य नागरिक असलेले बंब व शिक्षणसम्राट सतिश चव्हाण यांच्यात मुकाबला आहे असे विचारले असता चव्हाण म्हणाले बंब सामान्य माणूस आहे का तेथील जनतेला माहीत आहे. मी शैक्षणिक संस्था बळकावले नाही तर संविधानानुसार निवडणूक जिंकून निवडून आले आहेत. हे आरोप बिनबुडाचे आहेत असे त्यांनी सांगितले.
What's Your Reaction?






