विभागीय आयुक्तांनी घेतला अतिवृष्टीतील नुकसानीचा आढावा
विभागीय आयुक्त जितेंद्र पापळकर यांनी घेतला अतिवृष्टीतील नुकसानीचा आढावा...
छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद), दि. 26(डि-24 न्यूज)-: विभागीय आयुक्त जितेंद्र पापळकर यांनी घेतला अतिवृष्टीतील नुकसानीचा आढावा घेतला. सप्टेंबर महिन्यात झालेल्या अतिवृष्टीतील नुकसानीचे पंचनामे तातडीने पूर्ण करा, असे निर्देश श्री.पापळकर यांनी यावेळी दिले.
विभागीय आयुक्त श्री. पापळकर यांनी अतिवृष्टीच्या अनुषंगाने आज विभागातील सर्व जिल्हाधिकारी यांची दुरदृष्यप्रणालीद्वारे आढावा बैठक घेतली. बैठकीला विभागातील सर्व जिल्हाधिकारी, अपर आयुक्त खुशालसिंह परदेशी, अपर आयुक्त डॉ. अनंत गव्हाणे तसेच संबंधित विभागाचे अधिकारी उपस्थित होते.
छत्रपती संभाजीनगर विभागात माहे जून 2025 ते सप्टेंबर 2025 या कालावधीत अतिवृष्टी झालेली आहे. या अतिवृष्टीच्या अनुषंगाने पंचनामे करण्यात आलेल्या जून ते ऑगस्ट 2025 या कालावधीतील नुकसानी बाबत शासनाकडुन मागणीनुसार निधी प्राप्त झाला असून सदर निधीचे डीबीटी प्रणालीद्वारे संबंधित बाधित शेतकऱ्यांना वाटप करण्यात येणार आहे.
शासनाकडून सदर निधी संबंधित शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करण्यासाठी बाधित शेतकऱ्यांनी ई केवायसी करणे आवश्यक आहे. संबंधित शेतकऱ्यांनी याद्या प्रसिद्ध होताच त्वरित ई-केवायसी करून घ्यावी, असे आवाहन विभागीय आयुक्त श्री. पापळकर यांनी केले.
What's Your Reaction?