महायुती सरकारच्या विरोधात काँग्रेसने केले चिखलफेक आंदोलन...!

 0
महायुती सरकारच्या विरोधात काँग्रेसने केले चिखलफेक आंदोलन...!

राज्य सरकारच्या विरोधात काँग्रेसचे चिखलफेक आंदोलन, खासदार काळेंची दांडी...! 

जालन्याचे खासदार तथा जिल्हाध्यक्ष डॉ कल्याण काळे यांची गांधी भवन येथे कार्यकर्त्यांनी दोन तास येण्याची प्रतिक्षा केली तरी आले नाही नंतर आंदोलन सुरू करण्यात आले...

छ.संभाजीनगर(औरंगाबाद)दि.21(डि-24 न्यूज) महाराष्ट्र प्रदेश काँगे्रस कमिटीच्या आदेशानुसार पक्षाचे मुख्य कार्यालय गांधी भवन शहागंज येथे महायुती सरकारच्या विरोधात शुक्रवारी काँग्रेसचे कार्यालय गांधी भवन समोर चिखलफेक आंदोलन करण्यात आले. राज्यातील व केंद्रातील भाजपा सरकार हे शेतकरी कष्टकरी, दलित, अल्पसंख्याक, महिला, तरुण, गरीब व सामान्य जनतेच्या विरोधात आहेत. मागील १० वर्षापासुन भाजपा सराकरने राज्यातील औद्योगिक विकासाला खिळ घातली आहे. चिखलात पोलिस भरती सुरू,सरकारी नौकर भरती केली जात नाही, स्पर्धा परिक्षा वेळेवर घेतल्या जात नाही ज्या परिक्षा घेतल्या त्या परिक्षा पेपर फुटीमुळे प्रलंबीत झाल्या आहेत. शेतकरी संकटात आहेत त्यांना मदत केली जात नाही. कांदा, कापुस, सोयाबीन यांसह कोणत्याही शेतमलाला भाव नाही. सरकार जनतेला मदत करण्या ऐवजी उदयोगपतींना मदत करत आहेत. महिला सुरक्षित नाहीत, खत बि बियाणाचा काळा बजार चालु आहे. राज्यात बिघडलेली कायदा सुव्यवस्था श्रीमंताचे मुल गरीबांच्या मुलांना गाडीखालुन चिरडुन मारत आहेत. मुलींचे दिवसा ढवळया खुन केला जात आहे. सरकार निषेध म्हणुन केंद्रा आणि राज्य सरकार प्रतित्मात्क पुतळयाला पक्ष कार्यालय गांधी भवन शहागंज येथे शहर जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष शेख युसूफ यांच्या प्रुमुख उपस्थित चिकलफेक आंदोलन करण्यात आले.  

यावेळी शहरजिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष शेख युसूफ, महाराष्ट्र प्रदेश सेवादलाचे प्रदेश अध्यक्ष विलास बापु औताडे, जिल्हा प्रभारी अ‍ॅड.मुजाहेद खान, माजी शहर अध्यक्ष इब्राहीम पठाण, माजी शहर अध्यक्ष अ‍ॅड.सययद अक्रम, रोजगार स्वयंमरोजगारचे प्रदेश अध्यक्ष योगेश मसलगे, अ‍ॅड.एकबालसिंग गिल, महिला शहर काँग्रेस अध्यक्षा दिपाली मिसाळ, महिला जिल्हा अध्यक्षा दिक्षा पवार, शहर जिल्हा काँगेस कमिटीचे सरचिटणीस अनिस पटेल, उमाकांत खोतकर, अल्पसंख्याक विभागाचे अध्यक्ष मोईन ईनामदार, शहर उपाध्यक्ष डॉ.अरुण शिरसाठ, रेखा राऊत, डॉ.पवन डोंगरे, डॉ.निलेश आंबेंवाडीकर, शेख रईस, महेंद्र रमंडवाल, मसरुर सोहेल खान, संतोष भिगारे, अनिता भंडारी, परवीन जलील देशमुख, रेखा मुळे, विदया लांडगे, आसमत खान, श्रीराम इंगळे, आमेर रफिक खान, प्रा.रमाकांत गायकवाड, सयद युनुस, चंद्रकांत बनसोडे, योगेश थोरात, चंद्रप्रभा ख्ांंदारे, सलीम खान, सयद पैâयाजोददीन, शेख कैसर साहेबराव बनकर बाबा, मिजाज खान, इरफान इब्राहीम पठाण, इरफान गुलाब खान,नदीम सौदागर, सुनिल डोणगांवकर, अब्बास पठाण, सबीया बाजी, कल्याण कावरे पाटील, जुल्फेखार शेख, अलताफ शेख, रफिक खान, उतम दणके, फेरोज खान, शिंदे आदी पदाधिकारी उपस्थित होते.

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow