सर्वसामान्य शेतकरी पुत्राची प्रचारासाठी चंद्रकांत खैरे यांना एक लाखाची मदत

 0
सर्वसामान्य शेतकरी पुत्राची प्रचारासाठी चंद्रकांत खैरे यांना एक लाखाची मदत

सर्वसामान्य शेतकरी पुत्राची प्रचारासाठी चंद्रकांत खैरे यांना एक लाख रुपयांची मदत

माझी निवडणूक जनतेने हातात घेतली, हीच माझी शक्ती - शेतकरी नारायण सुरे यांच्याकडून धनादेश स्वीकारताना खैरे भावुक

औरंगाबाद, दि.8(डि-24 न्यूज ) गेल्या अनेक वर्षांपासून जनतेची सेवा चंद्रकांत खैरे करत आहे. सत्तेत असो वा नसो खैरे मदतीला धावून जातात हा अनुभव अनेकांना आला. आता मात्र निवडणूक असल्याने महागाईच्या झळा सर्वांना बसत आहे. याची जाणीव झाल्याने हर्सूल येथील सर्वसामान्य शेतकरी नारायण सुरे प्रचारासाठी चंद्रकांत खैरे यांना एक लाख रुपयांची मदत केल्याने अनेकांच्या भुवाया उंचावल्या.

यावेळी महाविकास आघाडीचे उमेदवार चंद्रकांत खैरे यांना सर्वच स्तरातून होईल तितकी मदत करत आहे. त्यामुळे माझी निवडणूक जनतेने हातात घेतली, हीच माझी शक्ती असल्याचे खैरे यांनी सांगितले. अडचणीच्या काळात सर्वसामान्य बळीराजाकडून धनादेश स्वीकारताना खैरे मात्र भावुक झाले. नारायण सुरे यांची हर्सूल परिसरात शेती असून, त्यांनी यापूर्वी अनेक सामाजिक उपक्रम राबविले आहे. हरसिद्धी माता मंदीरात सुशोभीकरण कामासाठी मदत केली होती.

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow