कापसाच्या शेतात गांजाची शेती, दौलताबाद पोलिसांनी पकडला अडीच लाखांचा गांजा
कापसाच्या शेतात गांजाची शेती, दौलताबाद पोलिसांनी पकडला अडीच लाखांचा गांजा
औरंगाबाद, दि.18(डि-24 न्यूज) दौलताबाद नजीक जांभळा गावातील कापसाच्या शेतात चक्क गांजाचे झाड आढळून आल्याने दौलताबाद पोलिसांनी अडीच लाखांचा गांजाची झाडे जप्त केल्याने खळबळ उडाली आहे.
अजब सिंग रामसिंग जारवाल, वय 65, राहणार वरझडी, तालुका गंगापूर असे आरोपीचे नाव आहे.
पोलिसांनी शुक्रवारी रात्री शिवारातील गट क्रं.84, 9.30 वाजेच्या दरम्यान छापा मारला तेव्हा कापसाच्या शेतात चार ते पाच फुटांची 40 झाडे आढळून आले. यांचे वजन 42 किलो झाडे जप्त करण्यात आली.
पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे.
दौलताबाद पोलिस ठाण्याचे प्रभारी पोलिस निरीक्षक कैलास देशमाने यांना खबरीमार्फत हि माहिती मिळाल्यानंतर सापळा रचून छापा टाकला.
सहाय्यक पोलीस निरीक्षक संजय गिते पुढील तपास करीत आहे. सदरील कार्यवाही पोलिस उपायुक्त नितीन बगाटे, सहाय्यक पोलीस आयुक्त महेंद्र देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक कैलास देशमाने, उपनिरीक्षक सचिन वायाळ, रावसाहेब राठोड व पोलीस कर्मचारी यांनी केली आहे.
What's Your Reaction?