जिल्हा परिषदेत महायुतीचा डंका, काँग्रेस, राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाला महापालिकेसारखी एकच जागा, उबाठाला 9 जागा...
जिल्हा परिषदेत महायुतीचा डंका, काँग्रेस, राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाला महापालिकेसारखी एकच जागा... एमआयएम, वंचितला खातेही उघडता आले नाही...
छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद), दि.9(डि-24 न्यूज) - 7 फेब्रुवारी रोजी झालेल्या जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणूक झाली. आज मतमोजणी झाली. निकालानंतर स्पष्ट झाले महायुतीचा डंका या निवडणुकीत पुन्हा दिसून आला. नगरपरिषद, महापालिकेनंतर या निवडणुकीत सुध्दा विजयी घोडदौड बघायला मिळाली. भाजपाने जिल्हा परिषद निवडणुकीत 23+ पुरस्कृत दोन असे 25 सदस्य निवडून आले. या निवडणुकीत एक नंबरचा पक्ष भाजपा ठरला 21+2 पुरस्कृत शिवसेनेचे सदस्य निवडून येत दुसऱ्या क्रमांकावर आहे. 9 सदस्य उबाठाचे निवडून येत तिसऱ्या क्रमांकावर आहे. राष्ट्रवादी अजित पवार पक्षाला 4 जागा मिळाली आहे. तर काँग्रेस व राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचा दारुन पराभव झाला आहे. महापालिकेच्या निवडणुकीत जी स्थिती होती तीच परिस्थिती जिल्हा परिषदेत दोन्ही पक्षांची झाली आहे. काँग्रेसला व राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे प्रत्येकी एक सदस्य निवडून आले आहेत. जिल्हा परिषदेत महायुतीला स्पष्ट बहुमत मिळाले आहे. कार्यकर्त्यांनी विजयाचा गुलाल उधळून जल्लोष साजरा केला.
छत्रपती संभाजीनगर जिल्हा परिषद 62 गटातून निवडून आलेल्या सदस्यांचे नाव (एकूण सदस्यसंख्या)
भाजपा 23 + 2 पुरस्कृत
शिवसेना (शिंदे) 21 + 1 पुरस्कृत
शिवसेना (उबाठा) 09
राष्ट्रवादी काँग्रेस (अजीत पवार) 04
राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) 01
काँग्रेस 01
अपक्ष 01
तालुकानिहाय विजयी उमेदवारांची यादी
छत्रपती संभाजीनगर तालुका (10 जागा)
लाडसावंगी – राधाकिशन पठाडे ( शिवसेना शिंदे)
गोलटगाव – ज्योती शिंदे (अपक्ष)
करमाड – साधना कुलकर्णी (भाजपा)
सावंगी – अजिनाथ धामणे (भाजपा)
दौलताबाद – लंकाबाई जाधव (भाजपा)
वडगाव उत्तरपूर्व – ललिता सोनवणे ( शिवसेना उबाठा)
वडगाव मध्यपश्चिम – सचिन गरड (अपक्ष-भाजप पुरस्कृत)
पंढरपूर – विद्या गायकवाड ( शिवसेना उबाठा)
आडगाव बु. – विजय घोडके ( शिवसेना शिंदे)
पिंप्री बु. – जयश्री पवार (भाजपा)
पैठण तालुका (9 जागा)
चितेगाव – कृष्णा गिधाने ( शिवसेना शिंदे)
बिडकीन – मनोज पेरे ( शिवसेना उबाठा)
आडूळ बु. – रुपाली तवार (शिवसेना शिंदे)
पाचोड बु. – शिवराज भूमरे ( शिवसेना शिंदे)
दावरवाडी – जयश्री वाघमोडे ( शिवसेना शिंदे)
ढोरकिन – राधिका जगताप ( शिवसेना शिंदे)
पिंपळवाडी – कारभारी लोहकरे ( शिवसेना शिंदे)
विहामांडवा – नितीन तांबे ( शिवसेना शिंदे)
नवगाव – पांडुरंग औटे ( शिवसेना शिंदे)
गंगापूर तालुका (9 जागा)
सावंगी – संगीता अमराव (भाजपा)
अंबेलोहळ – रतन बत्तीसे (भाजपा)
रांजणगाव – अमोल लोहकरे (भाजपा)
वाळूज बु. – बालाजी सोनटक्के (राष्ट्रवादी अजित पवार)
तुर्काबाद – स्वाती पाटेकर (शिवसेना शिंदे)
शिल्लेगाव – सविता जाधव (भाजपा)
नेवरगाव – वैजयंती शिरसाठ (राष्ट्रवादी अजित पवार)
जामगाव – दीपा मुंदडा (अपक्ष-भाजपा पुरस्कृत)
शेंदूरवादा – कृष्णा पाटील ( शिवसेना उबाठा)
वैजापूर तालुका (8 जागा)
वाकला – पार्वती जाधव (अपक्ष-शिंदे पुरस्कृत)
बोरसर – कल्याण गायके ( शिवसेना उबाठा)
शिवूर – संजय निकम ( शिवसेना उबाठा)
सवंदगाव – निताताई राजपूत ( शिवसेना शिंदे)
लासूरगाव – संगीता तांबे ( शिवसेना शिंदे)
घायगाव – श्रीराम गायकवाड ( शिवसेना शिंदे)
वांजरगाव – पंकज ठोंबरे (राष्ट्रवादी अजित पवार)
महालगाव – अविनाश गलांडे (भाजपा)
सिल्लोड तालुका (9 जागा)
अजिंठा – आयेशाबेगम सय्यद नासेर हुसेन – शिवसेना (शिंदे)
शिवना – निकिता काळे – शिवसेना (शिंदे)
उंडणगाव – सचिन वाघ – भाजपा
अंभई – अब्दुल आमेर अब्दुल सत्तार – शिवसेना (शिंदे)
घाटनांद्रा – आशा गाढे – शिवसेना (शिंदे)
डोंगरगाव – देविदास पालोदकर – शिवसेना (शिंदे)
भराडी – राधाकृष्ण काकडे – भाजपा
अंधारी – मंगल तायडे – शिवसेना (शिंदे)
केन्हाळा – अनिता मोठे – भाजपा
कन्नड तालुका (8 जागा)
नागद – तृप्ती राजपूत – काँग्रेस
करंजखेडा – अर्जुन पाटील – (राष्ट्रवादी अजीत पवार)
चिंचोली लिंबाजी – रावसाहेब पवार – शिवसेना (शिंदे)
पिशोर – केतन काजे – शिवसेना (उबाठा)
कुंजखेडा – सुनंदा चव्हाण – शिवसेना (उबाठा)
हतनूर – मीनाक्षी पवार – भाजप
जेहूर – मंजुषा मलदोडे – भाजप
देवगाव रंगारी – डॉ. संजय गव्हाणे – भाजपा
खुलताबाद तालुका (3 जागा)
बाजारसावंगी – प्रतीक्षा कापसे – भाजपा
गदाना – रेखा चव्हाण – भाजपा
वेरूळ – कुणाल दांडगे – भाजपा
फुलंब्री तालुका (4 जागा)
बाबरा – जितेंद्र जयस्वाल – भाजपा
वडोद बाजार – गोपाळ वाघ – भाजपा
पाल – गीतांजली वरुण पाथ्रीकर – राष्ट्रवादी शरदचंद्र पवार)
गणोरी – निखिल चव्हाण – भाजपा
सोयगाव तालुका (3 जागा)
फर्दापूर – मुलतानी माहिन इद्रिस –
भाजपा
आमखेडा – पुष्पाबाई काळे – भाजपा
गोंदेगाव – सुनीता चव्हाण – शिवसेना (उबाठा)
What's Your Reaction?