शहरालगत गावांचे सरपंचांनी केली कंट्रोल रुमची पाहणी

 0
शहरालगत गावांचे सरपंचांनी केली कंट्रोल रुमची पाहणी

शहरालगत गावांचे सरपंचांनी केली कंट्रोल रूमची पाहणी...

छ. संभाजीनगर(औरंगाबाद),दि.6(डि-24 न्यूज ) महानगर पालिकेच्या वतीने स्मार्ट सिटी अंतर्गत शहरावर कॅमेरा द्वारे लक्ष देण्यासाठी स्मार्ट सिटी कार्यालयात कंट्रोल रूम उभारण्यात आले आहे या कंट्रोल रूमची पाहणी आज शहरालगतच्या पेरी अर्बन गावातील सरपंच, ग्रामसेवक यांनी केली महानगर पालिकेचे आयुक्त जी. श्रीकांत यांनी या कंट्रोल बाबत सविस्तर माहिती दिली यावेळी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी तथा प्रशासक विकास मीना उपस्थित होते.

        स्मार्ट सिटी कार्यालयात आज शहरालगतच्या पेरी अर्बन मधील 35 ग्रामपंचायतीमध्ये घनकचरा व सांडपाणी व्यवस्थापन, पाणीपुरवठा बाबत आढावा घेऊन मार्गदर्शन करण्यासाठी बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. त्यानिमित्त कंट्रोल रूमला भेट देण्यात आली स्मार्ट सिटी अंतर्गत शहरात 700 सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात आले आहे. यासाठी स्मार्ट सिटी कार्यालयात कंट्रोल रूम उभारण्यात आलेले आहे या कंट्रोल रूममधून शहरातील घरावरील मालमत्ता कर, पाणीपट्टी ड्रेनेज लाईन, स्ट्रीट लाईट पाणीपुरवठा पाईपलाईन, शाळेतील विद्यार्थ्यांची उपस्थिती, शहरात उभारण्यात आलेले अनाधिकृत बॅनर, अवैध पार्किंग, ओपन स्पेस वरील मालमत्ता कर, नियमित कचरा उचलण्यासाठी माझा स्वच्छता साथी, लोकांच्या तक्रारीचे निवारण करण्यासाठी प्रलंबित तक्रारी तक्रारीचा निपटारा, शहर सिटी बस लोकेशन, विद्यार्थ्यांची शाळेतील उपस्थिती याबाबत आयुक्त जी श्रीकांत यांनी सविस्तर मार्गदर्शन केले. सक्षम ग्रामपंचायतीने आपल्या ग्रामपंचायत मध्ये या पद्धतीची यंत्रणा उभारण्याचे आवाहन जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी तथा प्रशासक विकास मीना यांनी केले

        यावेळी जल जीवन मिशनचे प्रकल्प संचालक राजेंद्र देसले, ग्रामीण पाणीपुरवठ्याचे कार्यकारी अभियंता अजित वाघमारे, पेरी अर्बन मध्ये निवडलेल्या 35 ग्रामपंचायतीचे सरपंच, ग्रामसेवक, विस्तार अधिकारी पंचायत, जिल्हा पाणी व स्वच्छता मिशन कक्षातील तज्ञ सल्लागार उपस्थित होते.

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow