आर्यन राजगुरू आणि आयेशा शेख यांच्या कवितेची कुमार साहित्य संमेलनात निवड...

 0
आर्यन राजगुरू आणि आयेशा शेख यांच्या कवितेची कुमार साहित्य संमेलनात निवड...

आर्यन राजगुरू आणि आयेशा शेख यांच्या कवितेची कुमार साहित्य संमेलनात निवड...

छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद), दि.1(डि-24 न्यूज) -जिल्हाधिकारी कार्यालय छत्रपती संभाजीनगर आणि जिल्हा परिषद माध्यमिक शिक्षण विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने जिल्ह्यातील सर्व शाळांमधील विद्यार्थ्यांचे कुमार साहित्य संमेलन दोन फेब्रुवारी 2026 रोजी होत आहे. त्यामध्ये म.न.पा. हर्सूल शाळेतील इयत्ता नववीतील विद्यार्थी आर्यन राजपुरे आणि इयत्ता आठवीतील विद्यार्थिनी आयेशा फिरोज शेख यांच्या कवितेची निवड झालेली आहे. त्यांच्या या यशाबद्दल मनपा आयुक्त तथा प्रशासक जी. श्रीकांत, उपायुक्त अंकुश पांढरे ,नियंत्रण अधिकारी गणेश दांडगे , शिक्षणाधिकारी भारत तीनगोटे , विस्तार अधिकारी रामनाथ थोरे , कार्यक्रम अधिकारी ज्ञानदेव सांगळे, मुख्याध्यापक जगन्नाथ सपकाळ आणि शाळेतील सर्व शिक्षकांनी त्यांचे अभिनंदन केले आहे. त्यांना कविता लेखनासाठी म.न.पा. हर्सूल शाळेतील शिक्षक संजय कुलकर्णी यांचे मार्गदर्शन लाभले. हर्सूल शाळेतील विद्यार्थ्यांनी यापूर्वी, जिल्हास्तरीय नाट्य स्पर्धेत प्रथम क्रमांकाचे तसेच पथनाट्ये , फ्रेंच भाषेतही प्राविण्य मिळविले आहे. शाळेतील विद्यार्थ्यांच्या राज्यस्तरावर नभोनाटीकेचे राज्याच्या सर्व वाहिनींवर प्रसारण झालेले आहे. गेल्या पाच वर्षापासून मराठी भाषा गौरव दिनी शाळेतील विद्यार्थी साहित्य संमेलन घेतले जाते. त्याचे परिणाम हळूहळू दिसत आहे. विद्यार्थ्यांच्या विकासासाठी हर्सूल शाळेतील शिक्षक, लक्षण महालकर, अंकुश लाडके, संजय कुलकर्णी, संजय मोकळे, सुनील हिरेकर, रमेश वाडेकर, विशाल बाविस्कर, सहाने मॅडम, मोटे मॅडम, वैष्णव मॅडम, बांबर्डे मॅडम, मस्के मॅडम कन्नर मॅडम शिंदे मॅडम,दांडगे मॅडम, शेळके मॅडम, चव्हाण मॅडम, कीर्ती मॅडम शुभांगी मॅडम प्रयत्न करीत आहेत.

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow