वक्फ बीलाच्या विरोधात एसडिपिआय रस्त्यावर, महाराष्ट्रात केले आंदोलन

वक्फ बीलाच्या विरोधात एसडिपिआय रस्त्यावर, महाराष्ट्रात केले आंदोलन
छत्रपती संभाजीनगर(औरंगाबाद), दि.13(डि-24 न्यूज) केंद्र सरकारच्या वक्फ सुधारणा बील - 2024 च्या विरोधात आज महाराष्ट्रात सोशल डेमोक्रॅटिक पार्टी ऑफ इंडियाच्या(एसडिपिआय) वतीने विरोध प्रदर्शन करत हा बील मागे घेण्याची मागणी रोशनगेट येथे केलेल्या आंदोलनात करण्यात आली.
यावेळी मोठ्या संख्येने कार्यकर्ते उपस्थित होते. विरोध प्रदर्शन करणा-या कार्यकर्त्यांनी सरकारवर आरोप केले की वक्फ संपत्तीवर टाच आणण्यासाठी व अल्पसंख्याकांच्या अधिकाराचे हनन करण्यासाठी हे बील आणले गेले असा आरोप आंदोलकांनी केला. निषेध करण्यासाठी बीलच्या प्रती फाडण्यात आले. वक्फ संपत्तीवर सरकारी नियंत्रण मिळवण्यासाठी हा बील आणण्याचा कट केला आहे असाही आरोप प्रदर्शन करणारे कार्यकर्त्यांनी केला. हे विरोध प्रदर्शन औरंगाबाद, मुंबई, ठाणे, पुणे, नाशिक, नांदेड, परभणी, हिंगोली, धुळे, लातूर, जालना येथे करण्यात आले.
रोशनगेट येथे केलेल्या आंदोलनात प्रदेश महासचिव सय्यद कलिम, जिल्हाध्यक्ष साकी अहमद, जिल्हा महासचिव शेख नदीम, जिल्हा कोषाध्यक्ष हफिज अबुजर पटेल, मोहसीन खान, रियाज सौदागर, हाफिज समीउल्लाह, सिराज शेख आदी उपस्थित होते.
What's Your Reaction?






