हज हाऊसमध्ये वक्फ बोर्डाचे कार्यालय स्थलांतरित करण्यास एमआयएमचा विरोध, सिईओंना दिले निवेदन...!

 0
हज हाऊसमध्ये वक्फ बोर्डाचे कार्यालय स्थलांतरित करण्यास एमआयएमचा विरोध, सिईओंना दिले निवेदन...!

हज हाऊसमध्ये वक्फ बोर्डाचे कार्यालय स्थलांतरित करण्यास एमआयएमचा विरोध

वक्फ बोर्डाचे सिईओ यांना विरोधीपक्षनेते समीर साजिद बिल्डर यांच्या नेतृत्वाखाली नगरसेवकांचे निवेदन

छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद), दि.20(डि-24 न्यूज)- पवित्र हज यात्रेसाठी जाणा-या भाविकांना प्रशिक्षण व धार्मिक कार्यासाठी अनेक आंदोलने केल्यानंतर किले अर्क येथे भव्य हज हाऊस शासनाने बनवले आहे. या इमारतीत वक्फ ट्रीब्युनल, अल्पसंख्याक आयुक्तालय आणि मार्टीसाठी काही खोल्या देण्यात आले आहे. आता महाराष्ट्र राज्य वक्फ मंडळाचे कार्यालय येथे स्थलांतरित करण्याच्या हालचाली सुरू असल्याचे समजले. येथे वक्फ बोर्डाचे कार्यालय स्थलांतरित करण्यास एमआयएमचा विरोध आहे. येथे हे कार्यालय स्थलांतरित करु नये असा कडक इशारा आजएमआयएमने दिला आहे. येथे शासकीय कार्यालयाची दमादमाने संख्या वाढली तर हज हाऊसचे पावित्र्य कमी होईल. जागा अपुरी पडेल. हज हाऊसमध्ये पूर्णवेळ अधिकारी व कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात यावी. स्वच्छता व देखरेख चांगले प्रकारे करण्यात यावी. वक्फ बोर्डाचे कार्यालय येथे आणू नये या मागणीसाठी आज विरोधीपक्षनेते समीर साजिद बिल्डर यांच्या नेतृत्वाखाली पनचक्की येथील महाराष्ट्र राज्य वक्फ मंडळाच्या कार्यालयात सिईओ यांना मागणीचे निवेदन देण्यात आले. शासनाच्या वतीने कार्यालय हज हाऊसमध्ये स्थलांतरित करण्याचा प्रयत्न केला तर हाणून पाडू व तीव्र आंदोलनाचा इशारा निवेदनात देण्यात आला आहे. याप्रसंगी एमआयएमचे नगरसेवक उपस्थित होते.

हज हाऊसमध्ये युपीएससी व एमपीएससी आणि स्किल्ड डेव्हलपमेंट कोर्स शिकवणी वर्ग सुरू करण्यात यावे यास आमचा विरोध राहणार नाही असे समीर साजिद बिल्डर यांनी यावेळी माध्यमांना सांगितले.

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow